Medical Nanorobot : नॅनो रोबोट गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांचा जीव वाचवणार, करणार कॅन्सरचाही खात्मा? पाहा व्हिडिओ

Medical Nanorobot News : नॅनो रोबोट गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांचा जीव वाचवणार आहे. नॅनो रोबोट आता कॅन्सरचाही खात्मा करणार आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नॅनो रोबोट गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांचा जीव वाचवणार, करणार कॅन्सरचाही खात्मा? पाहा व्हिडिओ
Medical NanorobotSaam tv
Published On

मुंबई : नॅनो रोबोटमुळे आता कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळणार आहे. एका शास्त्रज्ञाने हा रोबोट तयार केला असून, कॅन्सरच्या पेशींचा नाश करतो असा दावा करण्यात आलाय. जगभरात अनेक कॅन्सरचे रुग्ण आहेत. कॅन्सरमुळे अनेकांचा मृत्यू देखील झालाय. त्यामुळे नॅनो रोबोटमुळे कॅन्सर रुग्णांचा जीव वाचण्यात मदत होणार आहे.

नॅनो रोबोट करणार कॅन्सरचा खात्मा?

स्वीडिश शास्त्रज्ञांनी हा नॅनो रोबोट तयार केलाय, यामुळे कॅन्सरवरील रुग्णांना संजीवनी मिळणार आहे. सध्या या रोबोद्वारे स्तनाचा कॅन्सर असलेल्या उंदरावर चाचणी करण्यात आली आहे. नॅनो रोबोटमुळे उंदरांमध्ये ट्यूमरच्या वाढीमध्ये 70 टक्के घट झाली, असा दावा करण्यात आलाय. आता मानवांवर चाचणी घेण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम काय आहेत याची देखील चाचणी केली जाणार आहे.

नॅनो रोबोट गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांचा जीव वाचवणार, करणार कॅन्सरचाही खात्मा? पाहा व्हिडिओ
Viral News : आनंदी वातावरण क्षणात बदललं दु:खात; पदर जनरेटरमध्ये अडकून महिलेसोबत घडली भयंकर घटना

नॅनो रोबोट करणार कॅन्सरचा खात्मा?

स्वीडिश शास्त्रज्ञानं नॅनो रोबोट तयार केलाय

कॅन्सरच्या पेशींचा नाश करतो असा दावा करण्यात आलाय

थ्रोम्बिन नावाचं एन्झाइम आहे जे रक्त गोठवतं

थ्रोम्बिन रक्तवाहिन्यांच्या आत असलेल्या रक्ताला ट्यूमरपर्यंत पोहोचण्यापासून थांबवते

ट्यूमरमध्ये मिनी हार्ट अटॅक येतो, ज्यामुळे ट्यूमरच्या पेशी मरतात.

नॅनो रोबोट गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांचा जीव वाचवणार, करणार कॅन्सरचाही खात्मा? पाहा व्हिडिओ
Viral News : प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली; पती परिक्षेसाठी पडताच मध्यरात्री पत्नीने साधला डाव,पुढे जे घडले ते...

हे तंत्रज्ञान कॅन्सरवरील उपचारांवरदेखील वापरले जाऊ शकते. कारण ट्यूमरला उत्तेजन देणाऱ्या सर्व नसा जवळजवळ सारख्याच असतात. यामुळे सध्या याचा प्रयोग उंदरांवर करण्यात आलाय. मानवावर चाचणी घेण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम काय आहेत याची देखील चाचणी केली जाणाराय. त्यामुळे माणसांवरील कॅन्सरवर याचा उपयोग झाल्यास अनेक कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com