Sambhajinagar News : संभाजीनगर शहरात रोज १ हजार डेंगू सदृश्य तर १० हजार हिवतापाचे रुग्ण; डास निर्मूलन कागदावरच

Sambhajinagar News : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आरोग्य विभागाकडून हिवताप आणि डेंगूला रोखण्यासाठी अबेट, औषध फवारणी आणि डासाच्या उत्पत्ती स्थानावर विविध मोहिमा राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : सततचे बदलते वातावरण आणि सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात डेंगू, सर्दी, ताप यासारख्या साथीच्या आजारात वाढ होत चालली आहे. शहरातील २५ वार्ड हे डेंजर झोनमध्ये आहे. सद्यस्थितीला शहरात रोज १ हजार डेंग्यू सदृश्य तर १० हजार रुग्ण हे हिवतापाचे आढळून येत आहे. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णालय हाउसफुल झाली आहेत. 

Sambhajinagar News
Dhule News : स्वतःला जाळून घेणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू; घटनेपूर्वी काय घडले सीसीटीव्हीमध्ये कैद

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आरोग्य विभागाकडून (Health Department) हिवताप आणि डेंगूला रोखण्यासाठी अबेट, औषध फवारणी आणि डासाच्या उत्पत्ती स्थानावर विविध मोहिमा राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण (Sambhajinagar) महानगरपालिकांनी या योजना अजून प्रभावीपणे राबवायला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यामध्ये डेंगू सदृश्य रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरातील जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. 

Sambhajinagar News
Parbhani News : पावणेसात लाख शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान; कापूस- सोयाबीन ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक

दरम्यान शहरवासीयांकडून औषध फवारणी आणि फोगिंग करण्याची मागणी होत आहे. तर मोठी गर्दी असल्यामुळे वेळेवर उपचार होत नसल्याचे (Dengue) चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात साथरोग पसरत असल्याने महापालिकेने आता तरी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com