viral cricket video twitter
व्हायरल न्यूज

Viral Cricket Video: लेडी जहीर खानच्या बॉलिंगवर क्रीडामंत्री Clean बोल्ड! Video तुफान व्हायरल

Sports Minister Clean Bowled On Susheela Meena Bowling: गेल्या काही दिवसांपासून लेडी जहीर खान म्हणजेच, सुशीला मिणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगी हुबेहूब जहीर खान स्टाईल गोलंदाजी करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या इंस्टा फिडवर जाऊन पोहोचला.

त्यानंतर सचिनने हा व्हिडिओ रिपोस्ट केला. सचिनने व्हिडिओ शेअर केला, म्हणून या मुलीची भारतातच नाहीतर जगभरात चर्चा झाली. सचिनने व्हिडिओ शेअर करत जहीर खानलाही टॅग केलं होतं. या मुलीचं नाव सुशीला मिणा असं आहे.

आता या मुलीच्या गोलंदाजीवर क्रीडामंत्रीही क्लिन बोल्ड झाले आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सुशीलाने इंस्टाग्रामवर आपल्या गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला होता. ही १३ वर्षीय खेळाडू वेगवान मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. ती जहीर खान स्टाईलने गोलंदाजी करण्यासाठी ओळखली जाते. राजस्थानच्या प्रतापगढमध्ये राहणारी ही युवा गोलंदाज सध्या राजस्थान क्रिकेट संघासोबत सराव करत आहे.

राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांना केलं क्लिनबोल्ड

राजस्थानचे क्रीडामंत्री राजवर्धन सिंग राठोड क्रिकेट खेळण्यासाठी नेट्समध्ये आले त्यावेळी तिचा सामना सुशीला मिणासोबत झाला. आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर तिने राजवर्धन सिंग यांनी क्लिनबोल्ड केलं. सुशीलाने टाकलेल्या चेंडूवर क्रीडामंत्र्यांनी स्टेपआऊट होऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि चेंडूला यष्टीला जाऊन धडकला. भारताला अथेन्स ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकून देणारे, राजवर्धन सिंग राठोड यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ,' बिटिया से क्लीन बोल्ड होकर हम सब जीत गए..."असं कॅप्शन लिहिलं आहे.

सचिनने हा व्हिडिओ शेअर करत तिला लेडी जहीर खान म्हटलं होतं. सुशीला देखील डाव्या हाताची वेगवान गोलंदाज आहे. तिची गोलंदाजी स्टाईल देखील जहीर खानसारखीच आहे. सचिनने व्हिडिओ शेअर करताच सुशीला मिणा एका रात्रीत स्टार बनली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

SCROLL FOR NEXT