Mahendra singh Dhoni saam Tv
व्हायरल न्यूज

Video Viral: धोनीच्या साधेपणावर नेटकरी पुन्हा फिदा; आपल्या टी-शर्टने पुसली चाहत्याच्या बाईकवरील धूळ

Mahendra singh Dhoni: क्रिकेटप्रमाणे एमएस धोनीचं बाईकवर मोठं प्रेम असून बाईक हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनीचं कृत्य पाहून अनेकजण त्यांचं कौतुक करत आहेत.

Bharat Jadhav

Mahendra singh Dhoni Video:

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी नेहमी आपल्या कूल अंदाजामुळे चर्चेत असतो. धोनीच्या साधेपणावर नेटकरी नेहमी फिदा होत असतात. सोशल मीडियावर एमएस धोनीचे, असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यातील त्याचा साधेपणा अनेकांची मने जिंकणारा आहे. दरम्यान आजही असाच एक व्हिडिओ समोर आलाय त्यात धोनीचं वर्तन पाहून तुम्हीही त्याचे चाहते होणार आणि त्याच्या साधेपणाचं कौतुक कराल.(Latest News)

क्रिकेटप्रमाणे धोनीचं बाईकवर मोठं प्रेम असून बाईक हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनीसाठी बाईक किती जिव्हाळ्याची गोष्ट आहे हे समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, धोनीचा एक चाहता त्याच्याकडे बाईक घेऊ आलेला दिसतोय. तो चाहता धोनीकडे बाईकवर त्याचा ऑटोग्राफ मागतो. चाहत्याची हट्ट धोनी पूर्ण करतो. बाईकवर ऑटोग्राफ देण्यास तयार होतो. धोनी हेडलाईटवर ऑटोग्राफ देतो परंतु हेडलाईटवर धूळ होती तेव्हा धोनी स्वतःच्या अंगात घातलेला टी-शर्टाने धूळ पुसताना दिसतोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एमएस धोनीच्या जागी कोणी दुसरा व्यक्ती असता तर तो ऑटोग्राफ देऊन निघून गेला असता. परंतु धोनीचा स्वभावचं वेगळा. आपल्या टी-शर्टने चाहत्याची बाईक पुसली त्यानंतर ऑटोग्राफ दिला. यानंतर धोनी स्वत: त्या बाईकवर बसला त्याने हसत-हसत बाईक सुरू केली. धोनीच्या या क्यूट अंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेटकरी त्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

या कमेंटपैकी काही कमेंट आम्ही येथे शेअर करत आहोत. एक नेटकरी म्हणाला माहीला काही तोड नाही. इतका लोकप्रिय क्रिकेटर असूनही त्याने सामान्य लोकांप्रमाणे आपल्या शर्टने बाईक साफ केली. माही भाईची जमिनीशी नाळ किती घट्ट आहे, हे दिसतंय.

तर एक युजर म्हणाला की, प्रेम करणं कोणी यांच्याकडून शिकावं. खेळ असेल किंवा बाईक माही भाई मनाने त्यावर प्रेम करतात. धोनीच्या या व्हिडिओवर अजून एक चाहता म्हणाला कि, माही सारखे लोक नेहमी जन्म घेत नाहीत. तो कमालीचा कर्णधार आहे आणि अप्रतिम खेळाडू आहे. तुम्ही कौतुकास्पद आहात. आता तर मला बाईक घ्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Travel : वीकेंडला वन-डे सहलीचा बेत आखताय? 'हे' आहे मुंबईतील विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण

Maharashtra Live News Update: धाराशिव बस डेपोमध्ये तीन तास डिझेल नसल्याने एसटी बस सेवा बंद

Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला

Chanakya Niti: या ४ चूकांमुळे घरात येते गरिबी, हातात पैसा टिकत नाही; चाणक्यांनी सांगितले सत्य

Kolhapur Crime: सासऱ्याला लढायची होती निवडणूक, १० लाख रुपयांसाठी सुनेकडे तगादा; छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT