Team India Captain: रोहितनंतर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा पुढील कर्णधार! नेतृत्वात दिसते धोनीची झलक

Rohit Sharma Replacement: कोण आहे प्रबळ दावेदार जाणून घ्या.
team india
team indiasaam tv news
Published On

Team India New Captain:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सुरुवातीचे १० सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचं तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मोडलं. हा रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा वनडे वर्ल्डकप असू शकतो. ३६ वर्षीय रोहित शर्मा लवकरच कर्णधारपदाबाबतही मोठा निर्णय घेऊ शकतो. दरम्यान रोहित शर्मानंतर कोण होऊ शकतो भारतीय संघाचा पुढील कर्णधार? जाणून घ्या.

हा खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार...

रोहित शर्मा हा विराट कोहलीनंतर संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. रोहितनंतर भारतीय संघात एक असा खेळाडू आहे, जो भारताच्या वनडे संघाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकतो. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आहे.

हार्दिक पंड्याने आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२ स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिलं होतं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची झलक पाहायला मिळते,असं अनेक क्रिकेट जाणकार सांगतात. (Latest sports updates)

तो गरज असताना संघासाठी आक्रमक फलंदाजी करतो. तर संघाला गरज असताना विकेट्सही काढून देतो. त्याची अष्टपैलू कामगिरी पाहून अनेकदा त्याची तुलना माजी भारतीय कर्णधार कपिल देवसोबतही केली गेली आहे. त्यामुळे जर त्याच्यावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली, तर तो कपिल देव सारखाच सुपरहीट ठरु शकतो.

team india
David Warner Tweet: मला माफ करा.. वर्ल्डकप जिंकल्यानंतर वॉर्नरने भारतीय फॅन्सची मागितली माफी; काय आहे कारण?

हे खेळाडूही आहेत शर्यतीत..

हार्दिक पंड्यासह आणखी काही खेळाडू आहेत जे भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. ज्यात केएल राहुल, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.

team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा; 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com