सध्या ऑनलाईन गेम खेळण्याचा ट्रेंड सुरू आहे. मात्र या खेळात अनेकांची आर्थिक फसवणूक होते. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीनेही ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात तब्बल १५ लाख रुपयै गमवालेत. विशेष म्हणजे हा सर्वप्रकार युपी पोलीस शिपायाने केलाय. या पोलीस शिपायाचा विचित्र प्रकार समोर आलाय.
या पोलीस शिपायाने ऑनलाइन गेमिंगच्या नादात १५ लाख रुपये गमावले. त्यानंतर त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मदत मागितली. त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने गमावलेले पैसे बायको आजारी असल्याचं नाव करत लोकांकडून उसने घेतले होते. ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकू असा अंदाज बांधत त्याने लोकांकडून पैसे उसने घेत गेम खेळला मात्र यात त्याने तब्बल १५ लाख रुपये गमावले.
ऑनलाईन गेममध्ये १५ लाख रुपये गमावल्यानंतर हा शिपाई तणावात आला. कर्ज झाल्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता त्याने एक व्हिडिओ रिलीज करत थेट एसपी म्हणजेच पोलीस अधीक्षकाकडे मदत मागितलीय. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपयांची मदत मिळाल्यास कदाचित तो आत्महत्येचे पाऊल उचलण्यापासून वाचू शकेल, असे कॉन्स्टेबलने सांगितले. एसपी दीपक भुकर यांनी सांगितले की, कॉन्स्टेबलला कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस शिपायाचे नाव सूर्यप्रकाश असून तो २०१६ मध्ये युपी ११२ कार्यालयात तैनात आहे. सूर्यप्रकाशने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं की, तो ऑनलाईन गेम खेळायचा. त्याला ऑनलाइन गेम खेळायची सवय होती. त्यामुळे त्याने लोकांकडून बायको आजारी असल्याचं तो ऑनलाइन गेम खेळायचा. यासाठी पत्नीच्या आजारपणाच्या नावाखाली त्याने अनेक पोलीस कर्मचारी आणि इतर मित्रांसह कुटुंबीयांकडून पैसे घेतले. गेम खेळून पैसे जिंकू असा विचार करून त्याने गेममध्ये पैसे गुंतवले पण त्याने १५ लाख रुपये गमावले आहेत. आता त्याने पोलीस अधीक्षकांकडून मदतीचे आवाहन केलं. तसेच सर्व हवालदारांकडून प्रत्येकी ५००-५०० रुपये मदत मागितली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.