Viral Video: याला काय म्हणावं! तरुणीने स्कायडायव्हिंग करतानाही लिपस्टिक लावण सोडलं नाही; VIDEO पाहून नेटकऱ्यांचं डोकं गरगरलं

Shocking Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडिओ अंतरगी असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
Shocking Video
Viral VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर कायम धाडसी स्टंटचे दाखवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट करणारे अति उत्साही तरुण तर कधी तरुणी असतात. हे थरारक स्टंट पाहून अंगाचा थरकाप उडून जातो. तर अनेकदा स्टंट करताना तरुणाई कोणत्याही थराला जाईल सांगता येत नाही. मात्र स्टंट करताना अनेकदा या तरुणाईमधल्या अनेकांचा जीव जातो. मात्र सध्या असाच एक थरकार उडवणारा तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुणी तब्बल अनेक फूट उंचावर स्कायडायव्हिंग करताना चक्क मेकअप करते. सध्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक तरुणी आहे, जी एका विमानाचा दरवाजाजवळ स्कायडायव्हिंग करण्यासाठी उभी आहे. स्कायडायव्हिंग(Skydiving) करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य शिवाय सर्व अत्यावश्यक सोयी या महिलेकडे दिसून येत आहेत. मात्र व्हिडिओत तुम्ही महिलेच्या हातात पाहिले तर एक लिपस्टिक दिसून येत आहे. जी स्कायडायव्हिंगसाठी विमानातून उडी घेण्याआधी होटाला लिपस्टिक (Lipstick) लावते अन् मग विमानातून उडी मारते. तरुणीचा ही धक्कादायक स्टंट(Stunt) विमानातील एक व्यक्ती मोबाईलमध्ये कैद करत असतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवरील ''@laltihdama's'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''मुलगी स्कायडायव्हिंग'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ साधारण १ महिन्याआधी सोशल मीडियावर शेअर करताच तब्बल ५६ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक केलेले आहे तर अजूनही व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहे.

प्रतिक्रिया

तरुणीचा व्हिडिओ पाहताच इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा अतरंगी व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. तरुणीचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहताच यूजर्स अचंबित झालेले आहे तर अनेकांनी अतरंगी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,'' काय राव तरुणी'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' या तरुणी आणि महिला काय करतील काय सांगता येत नाही'', तर अनेकांनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

Shocking Video
Viral Video: 'जलवा है हमारा..' डॉली चायवाल्याची प्रायव्हेट जेटमधून सफर, स्वॅग अन् रुबाब पाहून नेटकरी हैराण; VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com