Ukhana Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Ukhana Viral Video: हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर... माझी बायको, नवरदेवाचा भन्नाट उखाणा ऐकताच नवरीचे डोळे गरागरा फिरले; Video Viral

Viral Video :लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bride Groom Viral Video:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ लग्नसंमारंभातील असतात. लग्नातील विधी, परंपरा, संगीत,डान्स असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्न म्हटल्यावर उखाणा हा घेतलाच जातो. महाराष्ट्रात लग्न झाल्यावर उखाणा घेण्याची परंपरा आहे. नवरा नवरीने उखाणा घेतल्यानंतरच त्यांचा गृहप्रवेश होतो. असाच एक मजेशीर उखाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत नवरा नवरी गृहप्रवेश करताना दिसत आहे. गृहप्रवेश करताना सर्वजण नवरदेवाला नाव घेण्यासाठी आग्रह करतात. मात्र, नवरदेवाला उखाणा काही सूचत नसतो. त्यावेळी त्याचा मित्र त्याला मदत करतो. तो त्याला कानात उखाणा सांगतो. उखाणा ऐकून नवरदेवाला मात्र खूप हसू येतं.

व्हिडिओत नवरा उखाणा घेताना दिसत आहे. 'हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर... माझी बायको जाम चाप्टर' असा उखाणा घेताच सर्वजण हसू लागतात. उखाणा ऐकताच नवरीदेखील आश्चर्यचकित होते. उखाणा ऐकल्यानंतर नवरी मस्करीत म्हणते, 'मी आता उखाणा घेत नाही'.

marathi_weddingz या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर युजर्संनी भन्नाट प्रतिक्रिया केल्या आहेत. 'भाऊ तुझं काही खरं नाही' असं एका युजरने म्हटलं आहे. तर अनेकांना 'खूप छान भावा' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT