Mumbai Police: 'माझी शांतता हरवली आहे...' महिलेच्या तक्रारीवर मुंबई पोलिसांचा फिल्मी स्टाईलमध्ये रिप्लाय

Mumbai Police Viral Post: मुंबई पोलिसांनी एक महिलेच्या तक्रारीला मजेशीर शैलीत रिप्लाय दिला आहे.
Mumbai Police Viral Post
Mumbai Police Viral PostSaam TV
Published On

Mumbai Police Filmy Reply On Social Media :

मुंबई पोलीस नेहमीच नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क असतात. पोलिसांमुळेच मुंबईकर रात्रीची सुखाची झोप घेतात असे म्हणायला हरकत नाही. मुंबई पोलिस रस्त्यावर उभे राहून जसे नागरिकांचे संरक्षण करत असतात. तसेच ते सोशल मीडियाच्या माध्यामातून देखील नागरिकांना महत्त्वाचे अपडेट देत असतात.

मुंबई पोलिस नेहमीच सोशल मीडियावरुन माहिती, व्हिडिओ, महत्त्वाचे अपडेट शेअर करत असतात. नुकतेच मुंबई पोलिसांनी एक महिलेच्या तक्रारीला मजेशीर शैलीत रिप्लाय दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई पोलिसांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवर रिप्लाय केला आहे. एक्स या प्लॅटफॉर्मवर @vedikaarya या हँडलवरुन एक पोस्ट करण्यात आली होती. 'मी पोलिस स्टेशनला जात आहे, माझी शांतता (सुकून) हरवली आहे'. अशी पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे.

महिलेच्या या पोस्टवर पोलिसांनी देखील मजेशीर स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. 'मिस आर्या, आमच्यापैकी अनेकजण शांततेच्या (सुकून) शोधात आहे. तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही तुमचे कौतुक करतो. आम्हाला खात्री आहे की, ही शांतता लवकरच मिळेल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर आमच्याकडे या. #EnsuringSukoonForMumbai #MumbaiFirst' असं उत्तर दिले आहे.

Mumbai Police Viral Post
Grandfather Fitness Video: वय तर फक्त आकडा! ७० वर्षांच्या आजोबांचा फिटनेस बघा, जीमला जाणारे तरूण बघतच राहतील

या पोस्टवर अगदी काही वेळातच हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर अनेक युजर्संनी कमेंट्स केल्या आहेत. याआधीही सोशल मीडियावर मुंबई पोलिसांनी मजेशीर पद्धतीने सुरक्षेबाबत संदेश दिले आहेत.

Mumbai Police Viral Post
Noida Crime News: कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्यासाठी महिला आणि IAS अधिकाऱ्याची जोरदार हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com