Riyan Parag: रियान... तुझं चुकलंच! सलग ७ अर्धशतकं ठोकूनही होतेय टीका; Video बघून तुम्हालाही हेच वाटेल

Riyan Parag Viral Video: सलग ७ सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणारा रियान पराग सोशल मीडियावर ट्रोल होतोय.
Riyan Parag Viral Video
Riyan Parag Viral Video twitter

Riyan Parag Viral Video:

आसामचा युवा स्टार फलंदाज रियान पराग सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकताच सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने आसामकडून खेळताना सलग ७ अर्धशतके झळकावली आहे.

या दमदार कामगिरीमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.मात्र स्पर्धेतील सातवे अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने असे काहीतरी केलं आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सलग ७ अर्धशतके..

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा रियान पराग देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आसाम संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत आपल्या संघासाठी खेळताना दमदार फलंदाजी केली आहे.

बंगालविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने स्पर्धेतील सातवे अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकासह त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सलग सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. देवदत्त पडिक्कलने या स्पर्धेत सलग ६ अर्धशतके झळकावली आहेत.

सेलिब्रेशनमुळे होतोय ट्रोल...

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. मात्र याच सेलिब्रेशनमुळे तो ट्रोल होऊ लागला आहे. या सेलिब्रेशनमध्ये तो असं बोलताना दिसून येतोय की,मी या लिगमध्ये असलेल्या खेळाडूंपैकी सर्वात वरच्या दर्जाचा खेळाडू आहे. माझ्यासारखा कोणीच नाही.' हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत. (Latest sports updates)

Riyan Parag Viral Video
IND vs SL: भारत- श्रीलंका लढतीपूर्वी जय शाह यांची मोठी घोषणा! वानखेडेवर या गोष्टीसाठी घातली बंदी

एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'रियान परागचा अॅटिट्युड तर पाहा.. हा एकमेव असा खेळाडू आहे जो एका गोलंदाजासारखी फलंदाजी करु शकतो आणि एका फलंदाजासारखी गोलंदाजी करु शकतो.'

तर दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले की,'रियान परागने सेलिब्रेशन करत असं म्हटलंय की मी या सर्व खेळाडूंपेक्षा वरच्या दर्जाचा खेळाडू आहे. दुर्देवाने तो यशस्वी भविष्याच्या शिखरावर एकटाच असेल.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रियान परागने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे. आसामचा संघ सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. या सामन्यात बंगालने २० षटकअखेर १३८ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना आसामने १७.५ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

Riyan Parag Viral Video
World Cup Points Table: अफगाणिस्तानच्या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! या ३ संघांचं टेन्शन वाढलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com