आपल्या देशात अनेक सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. उद्या सर्वत्र करवा चौथ आहे. लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत (उपवास) करतात.
१ नोव्हेंबर रोजी देशभरात करवा चौथ साजरा करण्यात येणार आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करतात. बॉलिवूडच्या डिवा त्यांच्या पतीसाठी करवा चौथचे व्रत करतात. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या पत्नीसाठी हा उपवास करतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा यावर्षी दुसरा करवा चौथ आहे. गेल्या वर्षी कतरिनाने पहिला करवा चौथचा व्रत केला होता. तिच्यासोबत विकीने देखील हा व्रत केल्याचे कतरिनाने एका मुलाखतीत सांगितले आहे.
रणवीर - दीपिका या बॉलिवूडच्या क्युट कपलने नुकतीच 'कॉफी विथ करण सीजन ८'ला हजेरी लावली होती. तेव्हापासून हे कपल चर्चेत आहे. रणवीर - दीपिकाने २०१८ साली लग्न केलं. एका मुलाखतीत रणवीरने तो दीपिकासाठी करवा चौथचे व्रत करत असल्याचे सांगितले होते.
अभिनेता आयुष्यमान खुराना देखील त्याची पत्नी ताहिरा कश्यपसाठी करवा चौथचा व्रत करतो. आयुष्यमान इंस्टाग्रामवर पोस्ट करत याविषयी सांगितले होते. त्याच्या पत्नीला कॅन्सर झाला होता. त्यामुले तिला उपवास करणे शक्य नव्हतं. त्यामुळे पत्नीसाठी आयुष्यमान करवा चौथचा व्रत करतो.
भारतीय क्रिकेटर विराट कोहली त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी दरवर्षी करवा चौथचे व्रत करतो. विराटने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याविषयी सांगितले होता.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडचे एक प्रसिद्ध कपल आहे. अभिषेक बच्चनच्या को-स्टारने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.' करवा चौथला अभिषेकने ऐश्वर्यासाठी व्रत ठेवला होता. परंतु तो सरगी करायला विशाल होता', असे अभिषेकच्या कोस्टारने सांगितले होते.
'UT ६९' या चित्रपटामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दोघेही चर्चेत आहेत. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासाठी करवा चौथ व्रत करते. तर राज कुंद्रा देखील दरवर्षी पत्नीसाठी करवा चौथचे व्रत करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.