Girl Beat Boy In Public Viral Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video News: बिचारा रे! मित्रांचं ऐकून प्रपोज केलं अन् फजिती झाली ... भररस्त्यात तरुणीनं चपलेनं झोडपलं; व्हिडिओ व्हायरल

Girl Beat Boy In Public Viral Video: मित्रांचा एक सल्ला ऐकल्याने या मुलाला मुलींचा भररस्त्यात मार खायला लागला, ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Trending Viral Video News: सध्या सर्वत्र फ्रेंडशिपडेचा (Friendship day 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेकांच्या मैत्रीचे किस्से, व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. प्रत्येकजण आपल्या मित्रांचे कौतुक करताना दिसत आहेत. पण अनेकदा आपल्या मित्रांनी दिलेला सल्ला महागातही पडू शकतो..

याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मित्रांचा एक सल्ला ऐकल्याने या मुलाला मुलींचा भररस्त्यात मार खायला लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घेवूया सविस्तर...(Viral Video News In Marathi)

मित्रांचा सल्ला महागात पडला...

शाळा, कॉलेजमध्ये प्रेमात पडणं ठरलेलं असतं. प्रत्येकाला शाळा, कॉलेजमध्ये असताना एखादी मुलगी आवडतेच. या प्रेमात अनेकदा मित्र चांगलीच फोडणी टाकण्याचे काम करत असतात. ती तुझ्याकडेच बघतेय, ती तुझ्यावर प्रेम करते असे सल्ले आपल्या मित्रांकडून अनेकदा दिले जातात.

मात्र मित्रांचा हाच सल्ला ऐकून भलतं धाडस करणे एका मुलाला चांगलेच महागात पडले आहे. मित्रांचे ऐकून तो मुलगा तरुणीला प्रपोज करायला गेला. मात्र या प्रकाराने संतापलेल्या मुलीने त्याला चांगलाच चोप दिला. ज्याचा व्हिडिओ त्याच्याच मित्रांनी शूट केला असून सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे.

मुलीने दिला चोप...

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, मुलगा आपल्या शाळेतील मैत्रिणीला प्रपोज करायला गेल्याचे दिसत आहे. मित्रांनी तशी खात्री दिल्यामुळे प्रपोज केल्यानंतर ती हो बोलेल.. असाच त्याचा समज झाल्याने तो बिंधास्त मुलीपुढे प्रेम व्यक्त करतो पण भलतचं घडलं. या संपूर्ण प्रकाराने संतापलेल्या तरुणीने मुलाला चांगला चोप दिला.

मुलीने त्याच्या जोरात कानशिलात लगावली. इतकेच नव्हेतर तिने पायातून चप्पल काढून मुलाला मारायला सुरूवात केली. या संपूर्ण प्रकाराने मुलगा चांगलाच घाबरुन गेल्याचे दिसत असून सॉरी दीदी म्हणत.. तो तरुणीची माफी मागत आहे. बिचाऱ्याची ही फजिती त्याच्याच मित्रांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी "दोस्त दोस्त ना रहा" म्हणत मित्रांनीच गेम केल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी 'प्रेमाच्या बाबतीत मित्रांचा सल्ला कधीच ऐकायचा नाही..' असेही सांगितले आहे. काही जणांनी 'असे मित्र कोणालाही मिळू नयेत' अशीही मजेशीर प्रतिक्रिय दिली आहे. थोडक्यात मित्रांचा सल्ला ऐकणे बिचाऱ्याच्या चांगलेच महागात पडले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT