Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकच ड्रेस दोघींना आवडला, मग दुकानातच राडा, महिलांची तुंबळ हाणामारी

Women Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही महिलांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. मात्र, याचे कारण काय ते पाहा.

Tanvi Pol

delhi Viral Video: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील प्रसिद्ध सरोजिनी मार्केट सध्या चर्चेत आलेले आहे. या वेळी याचे कारण ठरले ते एका ड्रेसवरुन झालेला वाद! तिथे दोन महिलांमध्ये ड्रेस घेण्यावरुन सुरु झालेला किरकोळ वाद थेट धक्काबुक्की आणि नंतर हाणामारीपर्यंत पोहचला. घडलेल्या या घटनेमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झालेला आहे.

दिल्लीच्या बाजारात हाय ड्रामा

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, बाजारात मोठ्या संख्येने ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. त्या मार्केटमध्ये एका कपड्याच्या दुकानात एक सुंदर ड्रेस असतो आणि जो दोन महिलांना खूप आवडलेला असतो. त्यानंतर तो ड्रेस त्यांना मिळावा म्हणून दुकान विक्रेत्याकडे त्या ड्रेसची मागणी करतात.

वादातून हाणामारीपर्यंत

दोघींना एकच ड्रेस आवडल्याने त्या दुकानदाराशी सोडून एकमेंकीशी करण्यास सुरुवात करतात. प्रारंभी हा वाद फक्त शाब्दिक असतो. पण अवघ्या काही क्षणात सर्व वातावरण तापते. त्यातील एक महिला दुसरीला ढकलेत, त्यावर समोरचीही संतप्त होते आणि दोघी एकमेंकीच्या केसांना धरुन दुकानातच हाणामारी करण्यास सुरुवात करतात. सर्व गोंधळामुळे बाजारातील दुकानदार आणि ग्राहकही हैराण झालेले दिसत आहेत.

हा व्हिडिओ (Video) सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सर्व प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या असून त्यातील एका यूजरने कमेंट केली,''महिलांच काही होऊ शकत नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नेहमीच आहे याचं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: महिलांच्या हाणामारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT