Viral Video News
Shocking VideoSaam Tv

Shocking Video: कामधंदा नाही म्हणून पत्नीचा संताप, नवऱ्याला भररस्त्यात केली मारहाण

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका नवरा- बायकोचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संतापला असून हैराणही झालेला आहे. असे काय घडले असेल ते पाहा.
Published on

Wife Beating Husband: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पत्नी आपल्याच नवऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत आहे. या घडलेल्या घटनेचं कारण ऐकून अनेक लोक थक्क झाला आहे. नक्की काय घडलं आणि या घटनेमागचं कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहा.

सोशल मीडियावर व्हिडिओने पसरली खळबळ

व्हायरल (Viral) झालेली ही घटना नेमकी कुठे घडली आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतं की, पती एकदम शांतपणे उभा असतो आणि त्याची बायको त्याच्याशी रागाने बोलतेय, त्यानंतर अचानक ती त्याच्या कानशिलात लगावते. तिथे असलेल्या काही लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र, काही वेळ ती महिला थांबली नाही.

पतीला नाही नोकरी, पत्नीचा संताप

व्हिडिओमध्ये लिहिलेल्या कॅप्शनुसार, पती गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार आहे आणि पैसेही कमावत नाही, या कारणावरून पत्नीने रागाच्या भरात सर्वांसमोर त्याला थपड मारली, असे कारण सांगण्यात आलेले आहे. मात्र, याची पुष्टी अद्याप झालेली नसून हा व्हिडिओ एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ पाहून लोक संतापले

व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संतापला आहे. तर काहींनी कमेंटबॉक्समध्ये आपली मतं ही व्यक्त केलेली आहे. त्यातील एका यूजरने महिले ही वागणे पाहून कमेंट केली,''समजून घेतलं असतं नवऱ्याला बर झालं असते'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्कीच वेगळं कारण असेल नाही तर महिला अशी मारणार (Fightung) नाही'' अशा प्रकारे काहींनी महिलेचीही बाजू घेतलेली आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video News
Fight Between Two groups : कचऱ्याचा वाद टोकाला; उरुसदरम्यान २ गटात तुंबळ हाणामारी,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com