Women Fight Video : कल्याण रेल्वेस्थानकावर WWE चा थरार; दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, प्रवासी बघतच राहिले

kalyan ticket counter viral video : तिकीट काढताना दोन महिलांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका दुसऱ्या महिलेने या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.
kalyan ticket counter viral video
Women Fight VideoSaam TV
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण रेल्वे स्थानकात असलेल्या तिकीट काउंटवर आज सकाळी तुफान राडा पाहायला मिळाला आहे. तिकीट काढताना दोन महिलांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका दुसऱ्या महिलेने या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

kalyan ticket counter viral video
IPL 2024 Tickets: IPL ओपनिंग सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना? बुकिंग कसं करायचं?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कल्याण पुर्वेकडे असलेल्या तिकीट काउंटरवर एक महिला तिकीट काढत होती. त्यावेळी तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. सुट्टे पैसे नसल्याने तिला तिकीट मिळत नव्हतं. त्यावरून तिकीट काउंटरवर असलेल्या कर्मचाऱ्याशी महिलेची बाचाबाची झाली. सुट्ट्या पैशांसाठी सुरू असलेला हा वाद पुढे हाणामारीत बदलला गेला.

तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याने झालेल्या वादात महिला प्रवाशांनी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली होती. व्हिडिओ काढत असल्याने तिकीट काउंटरच्या महिला स्टाफने व्हिडिओ काढत असलेल्या महिलेला मारहाण केली अशी माहिती मिळालीये. ही घटना घडत असताना इतर प्रवाशांनी गोंधळ घालत स्टाफच्या हातातून महिलेची केली सुटका केली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशनच्या सात नंबर प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकवर असलेल्या तिकीट काउंटरवर ही घटना घडलीये. तब्बल अर्धा तासाच्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवासी आणि तिकीट काउंटरवरील स्टाफ यांमधील वाद मिटला आहे. या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या फोनमध्ये कैद केला होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

kalyan ticket counter viral video
Pune PMP Bus Ticket: आनंदाची बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार आरामदायी, आता घरबसल्या काढता येणार पीएमपी बसचे तिकीट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com