IPL 2024 Tickets: IPL ओपनिंग सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना? बुकिंग कसं करायचं?

CSK vs RCB Ticket Price: आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. स्पर्धेतील पहिला सामना येत्या २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे
csk vs rcb ipl ticket price how to book ipl ticket know in marathi amd2000
csk vs rcb ipl ticket price how to book ipl ticket know in marathi amd2000yandex
Published On

CSK vs RCB Tickets Price And Booking Process:

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. स्पर्धेतील पहिला सामना येत्या २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. चेपॉकच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. दरम्यान हे तिकीच बुक कसं करायचं आणि तिकिटांची किंमत किती असेल? जाणून घ्या.

आयपीएल २०२४ स्पर्धेची सुरुवात साऊदर्न डर्बीच्या सामन्याने होणार आहे. हा सामना पाहण्यासाठीचं सर्वात स्वस्त तिकीट १७०० रुपयांना आहे. मात्र हे तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागू शकते. कारण या सामन्यासाठीचं तिकीट बुक करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

csk vs rcb ipl ticket price how to book ipl ticket know in marathi amd2000
WPL 2024: सलग दुसऱ्यांदा फायनल गमावल्यानंतर मेग लेनिंगला अश्रू अनावर! भावुक करणारा Video व्हायरल

या सामन्यासाठीचं तिकीट तुम्ही पेटीएम इनसाइडर किंवा बुक माय शो अॅपवरुन बुक करु शकता. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठीचं सर्वात स्वस्त तिकीट १७०० रुपये इतकं आहे. हे तिकीट सी लोव्हर, डी लोव्हर आणि इ लोव्हरचं असणार आहे. तर या तिकिटांची किंमत ४५०० पर्यंत जाऊ शकते. (Cricket news in marathi)

csk vs rcb ipl ticket price how to book ipl ticket know in marathi amd2000
IPL 2024: रोहित-हार्दिकमध्ये का रे दुरावा? व्हायरल फोटोमुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा

तर अपर सी,डी, इ,आय, जे आणि के सेक्शनच्या तिकीटांची किंमत ही ४००० ते ७५०० च्या घरात आहे. यासह व्हीआयपी तिकीटं देखील असणार आहेत. मात्र हे तिकीटं अजूनपर्यंत विक्रीसाठी काढण्यात आलेली नाहीत. पेटीएम इन्साइडरने दिलेल्या माहितीनुसार, एका वेळी केवळ २ तिकीटं बुक करता येणार आहेत. तर बुक माय शोवर बुकिंग थेट बंद करण्यात आली आहे.

तिकीट बुक करण्यासाठी काही अटी नियम देखील आहेत. तिकीट बुक करताना एका वेळी केवळ २ तिकीटं बुक करता येणार आहेत. तिकीट बुक केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी ७ मिनिटांचा अवधी असणार आहे. जर तुम्ही या ७ मिनिटात पेमेंट केला नाही तर तिकीट बुकिंग आपोआप रद्द होईल. (How to book ipl ticket)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com