सर्व क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या 17व्या हंगामाची. आयपीएलमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. चेन्नईचा संघ पुन्हा एकदा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
या स्पर्धेपूर्वी एमएस धोनी नेट्समध्ये सराव करताना दिसून आला आहे. धोनीनंतर चेन्नईचा पुढचा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ (CEO) कासी विश्वनाथन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन म्हणाले की, 'चेन्नई सुपर किंग्सचा पुढील कर्णधार कोण होणार याबाबत निर्णय प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी एकमताने घ्यावा. त्यांचा निर्णय स्पष्ट झाल्यास तुम्हाला मी पुढील माहिती देऊ शकेन.' असं त्यांनी सांगितलं आहे.
धोनीने IPL 2022 मध्ये CSK चे कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाकडे सोपवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना CSK ने आयपीएल 2023 स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
येत्या 22 मार्चपासून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा CSK चा संघ आयपीएल 2024 च्या मोहीमेचा श्री गणेश करणार आहे. आयपीएल 2024 मधील पहिला सामना चैन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे (CSK vs RCB). हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे.
आयपीएल 2023 नंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सर्वत्र होती. पण त्यानंतर धोनीने स्वता: या चर्चेंना पूर्णविराम दिला आणि चाहत्यांना खूश करत आणखी एक आयपीएल खेळण्याची घोषणा केली.
गेल्या हंगामात धोनी गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजत होता. यानंतर काही काळानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देण्यात आलं. आता धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.