Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: अर्रर्र! वृंदावनच्या मंदिरात भाविक भिडले! धक्काबुक्की अन् जोरदार मारहाण

Fight In Temple Video: सोशल मीडियावर तुम्हाला वारंवार अनेक अतरंगी घटना पाहण्यासाठी मिळतात. बऱ्याचदा अनेक घटनांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून तीव्र संताप दिसून येतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Tanvi Pol

Vrindavan Temple: वृंदावन हे एक हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असून येथे दररोज अनेक भक्त दर्शनासाठी मंदिरात येत असतात. परंतू, अलीकडेच येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने मंदिराच्या पवित्रतेला गालबोट लागले गेले आहे. वृंदावनमधील एका प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांमध्ये वाद निर्माण झाला आणि पाहता पाहता हा वाद जोरदार हाणामाराती बदलला.

महिलांची एकमेकींवर चपला आणि वेण्या ओढण्याची वेळ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला वृंदावनमधील एक मंदिर दिसून येत असून या मंदिरात भाविकांची गर्दीही दिसत आहे. अशातच भाविकांमधील दोन गटात दर्शन घेण्याच्या रांगेवरुन वाद झाला. त्यानंतर हा वाद इतका तीव्र झाला की दोन गटातील महिलांमध्ये हाणामारी (Fighting) होण्यास सुरुवात झाली. ज्यात महिलांनी एकमेंकीच्या वेण्याही ओढल्या तर काहींनी चपलाही मारल्या. सर्व घटनेचा व्हिडिओ तेथील एका भाविकाने मोबाईलमध्ये कैद केला.

हाणामारीच्या घटनेवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या गोंधळामुळे मंदिर प्रशासनही हैराण होते. सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र हाणामारी सुरु असलेल्यापैंकी कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''amarujala'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. शिवाय या संपूर्ण प्रकारामुळे मंदिरात आलेल्या इतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वृदांवनमधील हा व्हिडिओ(Video) काही तासांतच तुफान व्हायरल झाला आणि यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक लोकांनी अशा वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मंदिर प्रशासनाने अधिक चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, अशीही मागणी अनेक लोकांनी केली.

टीप: हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

SCROLL FOR NEXT