सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न म्हटलं की जल्लोष, पै पाहुण्यांची गर्दी, मस्ती, धिंगाणा अन् सेलिब्रेशन हे आलेच. लग्न सोहळ्यात प्रत्येक जण हिरहिरीने सहभागी होत असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जणाचा लग्न सोहळ्यात एक वेगळा थाट असतो. म्हणूनच नातेवाईकांच्या लग्नाची पत्रिका आली की हजेरी लावणे ठरलेलेच असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक चक्रावून टाकणारी पत्रिका समोर आली आहे. ज्यामध्ये लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १५ खतरनाक अटी ठेवण्यात आल्यात. ही जगावेगळी पत्रिका पाहून तुम्हीही डोके धराल.
सोशल मीडियावर लग्न सोहळ्यातील विविध व्हिडिओ, गमतीजमती, नवरा- नवरीची हटके एन्ट्री ते भन्नाट डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नात पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी अनेक आकर्षक पत्रिका छापल्या जातात, ज्यामधून आवर्जुन येण्याची विनंती केलेली असते. मात्र सध्या अशी एक लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. जी पाहून तुम्हीही चक्रावून जालं.
या पत्रिकेमध्ये लग्नात सहभागी होणाऱ्यांसाठी १५ खतरनाक अटी ठेवण्यात आल्या आहेत. लग्नातील जेवण, फोटोसेशन, गाणी याबाबतच्या सूचना यामधून देण्यात आल्यात. अशी हटके अन् पाहुण्यांना टेन्शनमध्ये टाकणारी लग्नाची पत्रिका पहिल्यांदाच पाहिली असेल.
काय आहेत १५ अटी?
1. हे लग्न नवरदेव आणि नवरीचे आहे, तुमचे नाही.
२. फोटोग्राफरच्या मधे मधे करु नका.
३. लग्नात येण्यासाठी काळा किंवा सोनेरी आऊटफिट आहे. लाल, निळा, हिरवा किंवा पांढरा नाही.
४. आसनव्यवस्थेची पुनर्रचना करू नका. आम्ही ही आसनव्यवस्था एका कारणासाठी बनवली आहे.
५. तुम्ही लग्नात पैसे दिले नाहीत. त्यामुळे तुमचे जे काही मत असेल ते ते तुमच्याकडे ठेवा.
६. मद्यपान करताना संयम ठेवा.
७. कोणताही प्रपोजल किंवा मोठी घोषणा होणार नाही.
८. तुम्हाला वाजवलेली गाणी आवडत नसल्यास थेट घरी जा. येथे शोकसभा नाही तर उत्सवाचे वातावरण आहे.
९. हा 99' आणि 2000 मध्ये जन्मणाऱ्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे ट्वर्किंग होईल.
१०. फोटो पोस्ट करण्यासाठी हॅशटॅग वापरायचा आहे.
११. रात्रभर बसून राहू नका.
१२. बाहेरून दारू आणू नका, पकडले तर हाकलून दिले जाईल.
१३. पहिल्या नियमाचे पालन करा
१४. नवरा नवरी म्हणतील तेच खरे
१५. वरचे नीयम नीट पाहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.