Akola : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या नेत्याची सुरक्षा वाढवली, कारण काय?

Akola Sajid Khan Pathan News : अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गॅंगशी संबंधित शुभम लोणकरकडून १० कोटींच्या खंडणीची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. धमकीनंतर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
Akola  : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या नेत्याची सुरक्षा वाढवली, कारण काय?
Akola Sajid Khan Pathan NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोला पश्चिमचे आमदार साजिद पठाण यांना खंडणीची धमकी

  • शुभम लोणकरकडून कॅलिफोर्नियावरून कॉल आल्याचा आरोप

  • धमकीनंतर आमदारांची सुरक्षा वाढवली

  • दोन आमदारांना धमक्या आल्याने पोलिस दलात खळबळ

अक्षय गवळी, अकोला

Sajid Khan Pathan Akola News अकोल्यात बिष्णोई गॅंगकडून सलग दुसऱ्या आमदाराला खंडणीसाठी धमकी मिळाली. अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकर याच्याकडून १० कोटी रुपयेच्या खंडणीसाठी धमकी मिळाली. १७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान आमदार पठाण यांना धमकीचा कॉल आला आहे. "दोन दिवसात १० कोटी रुपये दे., नाहीतर दोन दिवसात तुझा गेम करू", अशी शुभम लोणकरकडून आमदार साजिद खान पठाण यांना धमकी मिळाली. शुभम लोणकरकडून आलेला कॉल हा कॅलिफोर्नियावरून आल्याचं समोर आलं आहे. आमदार पठाण यांना धमकीनंतर गेल्या तीन दिवसांपासून आमदार साजिद खान पठाण यांची सुरक्षा वाढवण्यात आली. चार शस्त्रधारी पोलीस पठाण यांच्या सुरक्षेसाठी तैनात झाली आहेत.‌

धमकी प्रकरणात आमदार पठाण आणि पोलिसांकडून अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे. धमकीनंतर आमदार पठाण यांची जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक झालीय. धमकीनंतर आमदार पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे तक्रार दिलीय. बिश्नोई गॅंगचा म्होरक्या शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेव्होरी बुद्रुक गावचा रहिवासी आहे. शुभम लोणकरकडून दोन आमदारांना धमक्या आल्याने अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Akola  : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या नेत्याची सुरक्षा वाढवली, कारण काय?
Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

कोण आहे शुभम लोणकर?

याआधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी आहेय. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होताये.

Akola  : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या नेत्याची सुरक्षा वाढवली, कारण काय?
Sambhajinagar Crime : मुंबई, पुण्यानंतर घोटाळ्याचं लोण संभाजीनगरात, १५० जणांना TWJ कंपनीने कोट्यवधीला गंडवलं, वाचा घटनाक्रम

अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. 'तो' गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जमिनावर सुटका झाली होती. शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहेये. त्यांचं अकोल्यातील नेव्होरी गांवात घर असून त्याच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप लागलं आहेय. तर रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील शुभम लोणकर याने स्वीकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com