Pune Politics: पुण्यात CM एकनाथ शिंदेंना धक्का! युवासेनेत मोठी फूट; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Pune Breaking News: पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली असून शिवसेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विचारात घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
Pune News: CM शिंदेंना पुण्यात मोठा धक्का! युवासेनेत मोठी फूट; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Eknath ShindeSaam Digital
Published On

सागर आव्हाड, पुणे|ता. १४ मे २०२४

लोकसभा निवडणुकाची धामधुम सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली असून शिवसेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विचारात घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीकडून पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. अशातच शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे तसेच पक्षाचा ग्रुपही सोडल्याची बातमी समोर आली आहे.

लोकसभा निवडणूक संपताच पुण्यातील गटात धुसफुस समोर आली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच युवासेनेतील आणखी पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेनेची फादर बॉडी ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Pune News: CM शिंदेंना पुण्यात मोठा धक्का! युवासेनेत मोठी फूट; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
IT Raid In Nanded: १४ कोटींची रोकड, १२ किलो सोनं; नांदेडमध्ये IT धाडीत १७० कोटींचं सापडलं

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळीच शिवसेना शिंदे गटातील नाराजीनाट्य समोर आले होते. पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान एकनाथ शिंदे हे शिवसेना शहरअध्यक्ष नाना भानगरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते. त्यांच्या जेवणाची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी जेवणास नकार दिला, त्यामुळे पदाधिकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती.

Pune News: CM शिंदेंना पुण्यात मोठा धक्का! युवासेनेत मोठी फूट; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Nashik Accident: ब्रेकिंग! नाशिकमध्ये कार- बसचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com