Bhopal Youth Drowns In Kaliyasot Dam As Friends Capture Live Video Of Tragic Incident Saam Tv
व्हायरल न्यूज

मित्रांसोबत गेलेला तरुण डॅममध्ये बुडाला; मृत्यूचा थरार LIVE कॅमेऱ्यात कैद

Live Video Tragedy: भोपालच्या एका डॅममध्ये मित्रांसोबत गेलेला तरुण पाण्यात बुडून मरण पावला. हा थरारक प्रसंग मित्रांनी मोबाईलवर शूट केला आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Tanvi Pol

Madhya Pradesh News: मध्यप्रदेशच्या भोपालमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. कलियासोत डॅममध्ये एक युवक बुडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला असून, तो व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

घटना घडली तरी कशी?

प्राथमिक माहितीनुसार, मृत युवक आपल्या मित्रांसोबत डॅमवर फिरण्यासाठी गेला होता. तिथे तो पोहण्याच्या उद्देशाने तो पाण्यात(Water) उतरला. काही वेळाने तो पोहत पोहत किनाऱ्याजवळ येतो. पण अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो पुन्हा खोल पाण्यात पडतो. त्यानंतर काही क्षणांतच तो पाण्यात गायब होऊन जातो.

डुबतानाचा 'LIVE' व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो अत्यंत धक्कादायक आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये युवक पाण्यातून किनाऱ्यापर्यंत येताना स्पष्टपणे दिसतो. त्याचे मित्र कदाचित मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होते. जसा तो तरुण किनाऱ्याजवळ पोहचणार असतो त्याच क्षणी त्याचा पाय घसरल्यावर त्याच्या हालचाली अधिकच घाईगडबडीत होतात आणि थोड्याच वेळात तो पूर्णपणे पाण्यात गडप होतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे काळजाचे ठोके चुकले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ(Video) वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे त्यानंतर असंख्य नेटकरी वर्गाने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यातच एका यूजरने म्हटलं की,''सावधगिरी बाळगली असती तर जीव वाचला असता'', दुसऱ्या यूजरने म्हटलं,''तरुणाईला का समजत नाही'' अशा तऱ्हेने काहींनी संतापजनक आणि भाविनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT