पावसाचा धुमाकूळ! पुरात अडकलेल्याच थरारक रेस्क्यू ऑपरेशन;VIDEO

Nagpur Heavy Rain: नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नरसाळा भागात अनेक घरे पाण्यात अडकली असून बचाव पथकांनी वेळेत धाव घेत कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. या रेस्क्यू ऑपरेशनचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Nagpur Heavy Rain
Rescue teams helping stranded families escape floodwaters in Nagpur’s Narsala area during heavy rainsSaam Tv
Published On

नागपूर शहरात काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागपूरच्या नरसाळा परिसरातील अनेक भागात पाणी साचलेले आहे. विशेषत म्हणजे मौर्य नगरी भागात एकाच कुटुंबाला पुरसदृश स्थितीचा सामना करावा लागत आहे. या कुटुंबामध्ये पती-पत्नी आणि तीन लहान बालकांचा समावेश असून हे संपूर्ण कुटुंब सध्या त्यांच्या घरात अडकलेले आहे.

परिसरात नाल्याचे पाणी शिरले

मौर्य नगरी भागाच्या शेजारीच वाहणाऱ्या एका मोठ्या नाल्याचं पाणी अचानक घरांच्या दिशेने वळलं. मुसळधार पावसामुळे(Rain) नाल्याला पूरसदृश स्वरूप आलं असून त्याचं पाणी रस्त्यावरून घरांच्या दिशेने वाहू लागलं आहे. परिणामी या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून बरेच कुटुंबांना वेळेत घराबाहेर निघता आलं नाही.

मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न

सध्या अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. नागपूर महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल आणि पोलिस विभाग या सर्व यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाल्या आहेत. रेस्क्यू टीम काही वेळात या ठिकाणी दाखल होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नरसाळा परिसरामध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये(Citizen) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागांमध्ये विजेचा पुरवठाही खंडित झाला असून, मोबाईल नेटवर्कही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेरील जगाशी संपर्क करणे कठीण झाले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Nagpur Heavy Rain
बाळाला घरातच ठेवून आई मुलीला शाळेत सोडायला गेली, चिमुकली चालत खिडकीत आली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com