
Pune Shocking Video: कात्रजजवळील गुजर निंबाळकरवाडी येथील खोपडे नगरमध्ये सकाळी नऊच्या सुमारास हृदयाचे ठोके वाढवणारी एक घटना घडली. एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीत एक लहान मुलगी बाहेरच्या बाजूला अडकलेली दिसली. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"लडकी गिर रही है!" असा आवाज कानावर येताच समोरच्या सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणारे योगेश चव्हाण गॅलरीत आले. त्यांनी पाहिलं की समोरच्या इमारतीतून एक मुलगी खिडकीबाहेर लटकत आहे. केवळ काही क्षणांचा उशीर झाला असता, तर भीषण अपघात(Accident) घडला असता.योगेश चव्हाण – पुणे अग्निशमन दलात तांडेल म्हणून कार्यरत, तेव्हा आठवड्याची सुट्टी असल्याने घरी होते. आंघोळ करून पेपर वाचत असताना आवाज ऐकून ते क्षणाचाही विलंब न करता धावतच घटनास्थळी पोहोचले. अंगावर फक्त बनियन आणि टॉवेल असतानाही त्यांनी क्षणभरही न थांबता जीव धाव घेतला.
मुलगी असलेल्या फ्लॅटला कुलूप होतं, घरात ती चिमुरडी एकटीच होती. त्याच वेळी मुलीची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडून परत येत होती. योगेश यांनी तिला परिस्थिती समजावून सांगितलं आणि तिच्याकडून कुलूपाची किल्ली घेतली. त्यांनी सुरक्षा दरवाजा, लॅच, मुख्य दरवाजा उघडला आणि शेवटी बेडरूमच्या दरवाज्याची कडी उघडून त्या लटकलेल्या चिमुकलीला सुरक्षितरित्या आत खेचून घेतलं. ही संपूर्ण घटना काही क्षणातच घडली, पण योगेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे एका निष्पाप जीवाचे प्राण वाचले. त्यांच्या या कामगिरीचं परिसरात कौतुक होत आहे.
सध्या हा व्हिडिओ(Video) युट्युबवरील saamtvया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यावर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे,''लहान पोरं काय करतील हे पालकांनापण आता सांगता येत नाही'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''या कारणांमुळे प्रत्येक वेळेस लहान मुलांकडे लक्ष द्यावे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.