बापरे! २६ फूट अजगराने शेतकऱ्याला जिवंत गिळलं; घटना समजताच गावकऱ्यांचा उडाला थरकाप; VIDEO

Shocking Python Attack: सोशल मीडियावर एक भयंकर घटना व्हायरल होत आहे. २६ फूट लांब अजगराने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला जिवंत गिळले. ही बातमी समजताच गावात भीतीचं वातावरण पसरलं असून संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.
Villagers in shock as they cut open the python to find the missing farmer inside its belly in Indonesia
Villagers in shock as they cut open the python to find the missing farmer inside its belly in IndonesiaSaam Tv
Published On

Viral Video: शेतीकाम करताना बऱ्याचदा अनेक संकटे येतात, तरीही शेतकरी कधीही मागे हटत नाही. पण, यावेळी संकट एवढं भीषण होतं की, एक शेतकरी शेती करताना थेट २६ फूट लांब अजगराच्या तावडीत सापडला आणि थरारक मृत्यूचा शिकार झाला.

ही घटना इंडोनेशियातील असल्याचे समजत असून एका शेतकरी सकाळी लवकर शेतीकामासाठी घराबाहेर पाऊल टाकलं. मात्र संध्याकाळ होईपर्यंत तो परतलाच नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शेताकडं गेले असता तिथं त्याचा कुठेही थांगपत्ता नव्हता. मात्र काही अंतरावर झुडपात हालचाल दिसली आणि तिथेच जमिनीवर एक भलामोठा अजगर (Snake) आडवा पडलेला गावकऱ्यांना आढळून आला.

गावकऱ्यांनी त्याला पाहताच काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. मग गावकऱ्यांचे या अजगराच्या पोटाकडे लक्ष दिलं असता त्याचा आकार खूपच मोठा आणि फुगलेला दिसत होता. काही वेळाने गावकऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना आणि वनविभागाला माहिती दिली. तेथील अनुभवी लोकांच्या मदतीने अजगराला पकडून त्याच्या पोटात काय आहे हे पाहण्यासाठी त्याला कापण्यात आले आणि जो दृश्य उघडकीस आलं, ते पाहून सर्वच सुन्न झाले होते.

अजगराच्या पोटातून शेतकऱ्याचा संपूर्ण मृतदेह अखंड स्वरूपात बाहेर आला. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल(Viral) झालेला आहे. त्यानंतर फेसबूक, ट्वीटर(एक्स) आणि इन्स्टाग्राम अशा विविध प्लॅटफॉर्मवर तो पाहिला जात आहे. ऐवढेच नाही तर नेटकरी वर्गातून अनेक भीतीदायक आणि हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Villagers in shock as they cut open the python to find the missing farmer inside its belly in Indonesia
Snake Shocking Video: शांत झोपेत असताना अचानक आला किंग कोब्रा, हाता-पायावर फिरून नंतर...; तरुणाने स्वत:च काढला VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com