Student proposes to teacher on valentines day video SAAM TV
व्हायरल न्यूज

Video Viral: कॉलेजबाहेर सर्वांसमोर विद्यार्थ्यांने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, शिक्षिकेची रिएक्शन व्हायरल

Student proposes to teacher on valentines day video: व्हॅलेंटाईन डे निमित्त विद्यार्थ्याने शिक्षिकेला सर्वांसमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिक्षिकेच्या उत्तरानंतर नेटिझन्समध्ये चर्चा रंगली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला सर्वांसमोर प्रपोज केलंय. या व्हिडीओमध्ये त्याच्या मित्रांचा गोंगाट, 'Yes किंवा No' अशी सततची मागणी आणि शिक्षिकेचं अनपेक्षित उत्तर यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

व्हायरल होत असलेल्या काही विद्यार्थी त्यांच्या भोवती उभे राहून मोबाईलवर शूटिंग करत आहेत. त्याचवेळी एक विद्यार्थी पुढे येऊन शिक्षिकेला प्रपोज करतो. आजूबाजूचे मित्र शिक्षिकेला उत्तर देण्यासाठी ओरडताना दिसतायत. काही वेळानंतर शिक्षिका हसत “Maybe” असं उत्तर देते. हे ऐकताच विद्यार्थ्याचे मित्र एकच जल्लोष करतात.

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. काही सोशल मीडिया युजर्सनी याला धाडसी पण मजेशीर प्रकार म्हटलंय. तर अनेकांनी मात्र यावर आक्षेप घेत शिक्षकांविषयीचा आदर, शिस्त आणि वैयक्तिक मर्यादा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत.

युजर्सचं म्हणणं काय?

सोशल मीडिया ट्रेंड्स आणि व्हायरल कंटेंटच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांच्या वागणूकीत बदल होताना दिसतोय. लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक मर्यादा ओलांडताना दिसतायत. अशा कृतींमुळे शिक्षक-विद्यार्थी नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात, असंही मत व्यक्त केलंय.

दुसरीकडे, काही जणांच्या मते हा फक्त एक गमतीशील भाग असू शकतो. त्यामुळे त्याचा अधिक अर्थ काढू नये. मात्र शाळा किंवा कॉलेजच्या परिसरात कसं वागावं याबाबत स्पष्ट भान ठेवणं गरजेचं असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT