Snake Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Viral Video : बापरे! पेट्रोल पंपावर स्कुटीच्या हॅण्डलमधून निघाला साप; नुसती पळापळ, VIDEO व्हायरल

Viral Video : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपली स्कूटी घेऊन पेट्रोल पंपवर आला आहे. पेट्रोल पंपवर आल्यावर त्याने तेथे पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. तेव्हा स्कूटीमधून एक साप बाहेर आला.

Ruchika Jadhav

नवी मुंबई वाशी ट्रक टर्मिनल येथील पेट्रोल पंपवर एक साप आल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी पेट्रोल पंपवर साप अचानक बाहेर आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सापाच्या भीतीने काही नागरिकांना येथे पळापळही सुरू केली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपली स्कूटी घेऊन पेट्रोल पंपवर आला आहे. पेट्रोल पंपवर आल्यावर त्याने तेथे पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्कूटीच्या हॅण्डलमधून अचानक एक साप बाहेर आला. सापाला पाहताच पेट्रोल भरणारी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीची स्कूटी आहे त्या दोघांच्याही काळजात अगदी धस्स झालं.

त्यानंतर पेट्रोल पंपवरील अन्य कर्मचाऱ्यांनी या सापाला पकडलं आणि जंगलात सुखरूप सोडून दिलं आहे. सापाच्या या घटनेचा व्हिडिओ येथे उपस्थित अन्य व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर सापाचे या आधी देखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आता देखील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसामध्ये अनेक वन्य जीव आणि सरपटणारे प्राणी माणवी अधिवासात येत असतात. त्यामुळे श्युज, हेल्मेट, गाडीचे हॅन्डल असे कोणत्याही ठिकाणी ते लपून बसू शकतात. अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आणि किटकांपासून प्रत्येक व्यक्तीच्या जिवाला मोठा धोका असतो.

सोशल मीडियावर या व्हिडिओसह आणखी एक सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तर सापाने थेट मोठं सिंहासन निवडलंय. व्हिडिओ पाहून साप येथे पोहचला तरी कसा असा प्रश्न तुम्हालाही पडेल. कारण हा साप चक्क एका फॅनवर जाऊन बसला आहे. हा थरारक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT