Snake Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Viral Video : बापरे! ही तर सापांची जत्रा; व्हिडिओमधील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात

Snake Jatra Viral Video : एका गावामध्ये चक्क सापांची जत्रा भरली जाते. बिहारमधील एका छोट्याशा गावात ही प्रथा आहे. यामध्ये गावातील सर्व व्यक्ती एकत्र येतात आणि सापांची जत्रा भरवतात.

Ruchika Jadhav

आजवर तुम्ही विविध देवी देवतांचे मेळे किंवा जत्रा भरलेल्या पहिल्या असतील. जत्रा म्हटलं की सर्वत्र देवीचा किंवा देवाचा जल्लोष. बाजारपेठ विविध फुलांनी, फळांनी आणि रंगीत दिव्यांनी सजलेली दिसते. काही ठिकाणी आकाशपाळणे दिसतात. जत्रा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर हेच चित्र उभं राहतं. माणसांची गर्दी असलेल्या या जत्रेत कधी एखादा साप शिरला तर?

अशी कल्पना केली तरी अनेकांच्या अंगावर सरकन काटा उभा राहतो. मात्र तुम्हाला माहितीये का एका गावामध्ये चक्क सापांची जत्रा भरली जाते. बिहारमधील एका छोट्याशा गावात ही प्रथा आहे. यामध्ये गावातील सर्व व्यक्ती एकत्र येतात आणि सापांची जत्रा भरवतात. सापांची ही जत्रा पाहण्यासाठी विविध गावातील व्यक्ती येथे हजर होतात. काळजात धडकी भरवणारी ही दृश्य खरी आल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गावातील सर्व व्यक्ती एकत्र जमल्या आहेत. येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात साप आहे. कुणी लहान साप आणले आहेत, तर कुणी भले मोठे साप आपल्या हाताला गुंडाळून आणले आहेत. सापांची ही जत्रा नाग पंचमीच्या दिवशी भरते अशी माहिती आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहून नेटकरी देखील चकित झालेत. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. तर लाखोंच्या घरात व्हुव्ज सुद्धा आले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरात विविध परंपरा असतात. त्यानुसार काही परंपरा पाहून आपल्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. तशाच प्रकारचा हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओवर सापांचं एक गाणं सुद्धा लावण्यात आलं आहे. हे बिहारी भाषेतील गाणं या व्हिडिओला बरोबर सूट होत आहे. हे बिहार आहे येथे काहीही होऊ शकतं अशी कमेंट एकाने केली आहे. तर साप चावल्यावर काय करणार? असा प्रश्न देखील एकाने विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT