Snake Bite : आदिवासी महिलेचा सर्पदंशाने मृत्‍यू; कर्जतच्‍या आसलवाडीतील घटना, रस्‍त्‍याअभावी वेळेवर मिळाले नाही लवकर उपचार

Karjat News : सर्पदंश झाल्‍याचे लक्षात येताच ग्रामस्‍थांनी तिला डॉक्‍टरकडे नेण्‍याची तयारी सुरू केली. परंतु वाडीवर जायला रस्‍ता नसल्‍याने झोळी करून महिलेला जुम्‍मापट्टीपर्यंत आणावे लागले.
Snake Bite
Snake BiteSaam tv
Published On

सचिन कदम 
कर्जत
: कर्जत तालुक्‍यातील दुर्गम डोंगराळ भागातील आसलवाडी येथील आदिवासी महिेलेचा सर्पदंशाने मृत्‍यू झाल्याची घटना घडली आहे. सर्पदंश झाल्यानंतर रस्त्याअभावी सदर महिलेला लवकर उपचार मिळू न शकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Snake Bite
Nandurbar News : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची भटकंती; पाणी योजना अपूर्ण असल्याने प्यावे लागतेय दुषित पाणी

विठाबाई सांबरी असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. काम करत असताना विठाबाई यांना सर्पाने दंश केला होता. सर्पदंश (Snake Bite) झाल्‍याचे लक्षात येताच ग्रामस्‍थांनी तिला डॉक्‍टरकडे नेण्‍याची तयारी सुरू केली. परंतु वाडीवर जायला रस्‍ता नसल्‍याने झोळी करून महिलेला जुम्‍मापट्टीपर्यंत आणावे लागले. तेथून वाहनाने (karjat) नेरळ प्राथमिक आरोग्‍य केंद्रात आणले. या सर्व प्रकारात बराच वेळ गेल्‍याने उपचारादरम्‍यान विठाबाई हीच मृत्‍यू झाला. 

Snake Bite
Nanded Accident : हरीण धडकल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात; एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

२७ जुलैला करणार रास्ता रोको 

माथेरानच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या १२ वाड्यांसाठी रस्‍त्‍याच्‍या कामाचे भूमीपूजन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन केले होते. परंतु काम झालेच नसल्‍याने या महिलेला आपला जीव गमावावा लागल्‍याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. संतप्‍त आदिवासींनी येत्‍या २७ जुलैला नेरळ- माथेरान रस्‍त्‍यावर रास्‍तारोको करण्‍याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com