बिहारच्या पाटणामधुन एक मोठी बातमी समोर आलेली आहे. घराला भीषण आग लागली. या आगीतून भावंडांना वाचवताना सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिहारमधील बेगुसराय येथील मणिप्पा गावात घडली आहे. मंगळवारी रात्री (२८ मे) लागलेल्या आगीतून सहा वर्षीय सृष्टी कुमारीने आपल्या भावंडांना वाचवलं मात्र या आगीत तिचा मृत्यू झालाय.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, बिहारमधील (Bihar News) बेगुसराय येथील मणिप्पा गावात सृष्टी कुमारीचं कुटुंब राहत होतं. २८ मे रोजी आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात सृष्टी आणि तिची भावंडे होते. रात्री त्यांच्या घराला आग लागली. यावेळी सृष्टी आणि तिचे भावंडे झोपेत होती, पण आगीमुळे सृष्टीला जाग आली. तिने बचावाच्या हेतुने आपल्या भावंडाना उठवलं आणि आगीतुन बाहेर काढण्यात यश मिळवलं.
आगीची चाहूल लागताच सृष्टी अन् तिची सात वर्षांची बहिण आधी उठली होती. त्यानंतर सृष्टीने तिची १२ वर्षांची बहिण आणि भाऊ प्रियांशु आणि राजबाबू यांना उठवलं. ते घराबाहेर पळाले. पण पळताना सृष्टीचा पाय दाराजवळ असलेल्या सायकलच्या चाकात अडकला. ग्रामस्थांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश मिळालं नाही. या भीषण आगीत (Fire News) त्यांच्या दोन शेळ्या आणि इतर सामानासह संपूर्ण घर जळून खाक (Massive Fire) झालंय. सृष्टीने तिच्या भावांना वाचवलं मात्र तिचा मृत्यू झालाय.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, प्रकाशासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेलच्या दिव्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात (Girl Dies After Saving Sibling From Fire) आहे. सृष्टीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कुटुंबाला कबीर अंत्येष्टी योजनतर्गत तीन लाख रुपये आणि कुटुंब लाभ योजनेंतर्गत वीस हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत मिळाल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.