Rajkot Game Zone Fire : राजकोट गेमिंग झोन दुर्घटनेत मालकाचाही होरपळून मृत्यू; DNA चाचणीतून समोर आली धक्कादायक माहिती

Rajkot Game Zone Fire Update : गुजरातमधील जकोटमध्ये गेमिंग झोनला लागलेल्या भीषण आगीत एक मालक प्रकाश हिरन यांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. DNA चाचणीतूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Rajkot Game Zone Fire
Rajkot Game Zone FireSaam Digital

गुजरातमधील जकोटमध्ये गेमिंग झोनला लागलेल्या भीषण आगीत २८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या २८ जणांमध्ये गेमिंग झोनचे मालक प्रकाश हिरन यांचाही समावेश असल्याची माहिती डीएनए चाचणीतून समोर आली आहे. गेमिंग झोनमध्ये प्रकाश हिरन यांचा ६० टक्के हिस्सा होता.

गेमिंग झोनमध्ये आग लागली त्यावेळी प्रकाश हिरन यांनी गेमिंग झोनकडे धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी प्रकाश यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला होता. त्यावरून पोलिसांनी डीएनए नमुना घेतला घेऊन तपासणीसाठी गांधीनगरला पाठवला होता. दरम्यान डीएनए चाचणीचा नमुना एका मृतदेहाशी जुळला आहे.

25 मे रोजी राजकोटच्या TRP गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत लहान मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला होता. मृतदेह होरपळल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीद्वारे राज्य सरकार फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची (एफएसएल) मदत घेत आहे. या प्रक्रियेस बराच वेळ लागतो. जळलेल्या मृतदेहातून रक्ताचे नमुने गोळा करणे खूप अवघड असतं, त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनए जुळण्यासाठी मृतदेहांच्या हाडांचे नमुने गोळा केले आहेत, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.

Rajkot Game Zone Fire
Wardha Bus Fire : वर्धा जिल्ह्यात ट्रॅव्हल्स जळून खाक; बसमध्ये होते १७ प्रवाशी

या दुर्घटनेनंतर राजकोट गेम झोन घटनेत सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तिघांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. यानंतर धवल ठक्करलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. धवल ठक्करला राजकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राजकोट गेम झोनमधील आगीच्या घटनेची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंत २५ हून अधिक लोकांची चौकशी केली असून अनेक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.

Rajkot Game Zone Fire
Sixth Phase Polling: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 63.37 टक्के मतदान, निवडणूक आयोगाने जाहीर केली आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com