Wardha Bus Fire : वर्धा जिल्ह्यात ट्रॅव्हल्स जळून खाक; बसमध्ये होते १७ प्रवाशी
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागली असून प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पालोरा येथील पेट्रोलपंपानजीक ही दुर्घटना घडली आहे. ट्रॅव्हलर मध्ये एकूण 17 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा घाडगे जवळील पालोरा येथील पेट्रोलपंपानजीक धावत्या ट्रॅव्हल्समधून अचानक धूर येत होता. त्यामुळे बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर काही वेळातचं संपूर्ण बसने पेट घेतला. या बस पूर्ण जळून खाक झाली आहे. ट्रॅव्हलर मध्ये एकूण 17 प्रवासी होते. चालकाने वेळीच प्रसांगवधान राखल्याने जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
ट्रॅव्हल्स शेगाव येथून दर्शन घेऊन नागपूरकच्या दिशेने जात होती. दरम्यान आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी आगीवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बसचा बरचा भाग भागीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. दरम्यान तापमानात वाढ झाल्याने वाहनांना आग लागल्याच्या घटना घडत आहेत. मागील आठ दिवसात जिल्ह्यात चार ठिकाणी वाहनांना आग लागली आहे.
शिर्डीत बर्निंग कारचा थरार
शिर्डीत आज बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला साईभक्ताच्या कारने घेतल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. दरम्यान अचानक पेट. साईभक्त कुटुंब वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी टळली. मात्र कार जळून खाक झाली आहे. आग्नीशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.