The shocking moment when a youth got dragged under a local train while attempting a risky stunt captured on CCTV Saam Tv
व्हायरल न्यूज

भयंकर! शायनिंग मारायला गेला अन् ट्रेनच्या खाली चिरडला, २ किमीपर्यंत फरफटत गेला, पण... व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही घाबरुन जाल. नक्की काय घडले ते एकदा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Trending Video: सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारे आणणारा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणाने केवळ काही सेकंदांचे 'शायनिंग' मारण्यासाठी जीवाशी खेळल्याचे दिसून येत आहे. धावत्या लोकल ट्रेनला लटकण्याचा प्रयत्न केल्याने तो थेट ट्रेनच्या खाली गेला आणि चक्क २ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, एक व्यक्ती धावत्या ट्रेनला लटकलेला आहे. अन्य प्रवासी ट्रेनच्या खिडकीतून त्याला पाहत आहे. कोणीही त्याला वाचवण्याच्या प्रयत्ना दिसत नाही. जिवाच्या आकांताने तो व्यक्ती स्वत:ला धावत्या ट्रेनच्या खाली येण्यापासून वाचवत आहे. पण अखेरीस तो व्यक्ती ट्रेनच्या खाली येतो. सर्व धक्कादायक प्रकार ट्रेनमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

आजकाल तरुण पिढीमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. लाखो व्ह्यूजसाठी, काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी ते जीवाची पर्वा न करता स्टंट करताना दिसतात. अशा अनेक घटनांमध्ये आधीही अनेक तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत. हा प्रकार त्याचाच एक थरारक आणि चिंताजनक नमुना म्हणावा लागेल.

ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण त्याचा सर्व व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. @absyy_crazy या एक्स (ट्वीटर) अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

Bapu Aandhle Case : सरपंच हत्या प्रकरणाच्या आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, बीडमध्ये पुन्हा वातावरण तापले

Good News: सोलापूर- अहिल्यानगर आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पाण्याची चिंता मिटली; उजणी धरण १०० टक्के भरलं

समृद्धी महामार्गावर नियम धाब्यावर, दुचाकीवर तरुणाचा बिनधास्त प्रवास, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT