
Karad Car Crash: नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून कोणाच्याही अंगावर शहारा येईल. हा भीषण अपघात कराड तालुक्यातील सडावाघापूर येथे घडला. येथे 'उलटा धबधबा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळी एक तरुण कारमधून स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, क्षणाचाही चुकीचा निर्णय त्याच्या जीवावर बेतला. स्टंट करताना वाहनावरील ताबा सुटल्याने ही कार थेट खोल दरीत कोसळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सडावाघापूरमधील 'उलटा धबधबा' हा परिसर कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण मानला जातो. पर्यटनासाठी आल्यानंतर निसर्गाचे सौदर्य पाहण्यासाठी आणि फोटो, व्हिडिओ(Video) घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात. काहीजण मात्र थरार आणि साहसाच्या नादात जीवाशी खेळ करतात. अशाच प्रकारचा प्रयत्न संबंधित युवकाने केला आणि त्याचा परिणामी भीषण अपघात घडला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की, चालक कार चालवत असताना ती धबधब्याजवळील कड्यावरून थेट खाली कोसळते. या दृश्याने उपस्थित सर्वांची धडकी भरली. काही क्षणांमध्ये मदतीसाठी आरडाओरड झाली आणि काही स्थानिकांनी धावत जाऊन मदत केली. चालकास बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात येते.
कराडमधील या घटनेनंतर स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना आणि पर्यटकांना आवाहन केले आहे की, कृपया अशा धोकादायक ठिकाणी स्टंट (Stunt) करू नका. पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी नागरिक अनेक ठिकाणी फिरायला जातात, मात्र त्यावेळी सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याने घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.