Arunachal Pradesh: महाराष्ट्र असो वा अन्य राज्य अनेक पर्यटक फिरण्यासाठी जम्मू- काश्मीरला पसंती देतात. अनेकदा फिरण्यास गेल्यानंतर काही पर्यटकांना अति उत्साह महागात पडतो असेच काहीसे काही पर्यटकांसोबत घडलेले आहे. जे अरुणाचल प्रदेशमध्ये फिरण्यास गेलेल्या पर्यटकांसोबत घडली आहे. नक्की काय घडले ते एकदा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पहा.
व्हायरल (Viral) होत असलेली संपूर्ण घटना ही अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये घडली आहे. जिथे फिरण्यासाठी गेलेले चार पर्यटक गोठलेल्या तलावावर चालताना तोच बर्फ तुटल्याने त्यातच अडकले. त्यानंतर ते चारजण बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना स्वता:हून बाहेर निघता येत नाही. काही वेळाने त्या पर्यटकांना वाचवण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र अथक प्रयत्नानंतर चौघांनाही वाचवण्यात यश आलेले व्हिडिओत दिसत आहे.
व्हायरल होत असलेली घटना सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@KirenRijiju'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही करण्यात आलेला आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक भन्नाट आणि संतापजणक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील काही यूजर्संनी कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे,''काय गरज होती'' तर अनेकांनी लिहिले आहे,''करा अजून नको तिथे मस्ती'', अशा संबंधित प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये पाहण्यासाठी मिळतील.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.