
Indian Navy Accident Video: भारतीय नौदलाच्या जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन पॅराशूट एकमेकांमध्ये गुंतल्याने अपघात झाल्याचे पाहायला मिळते. यातील एका पॅराशूटला भारताचा तिरंगा जोडलेला असल्याचे दिसते. हा थरारक प्रकार विशाखापट्टणमच्या रामकृष्ण चौपाटीजवळ घडला आहे. या अपघातामध्ये कोणालीही हानी झाली नसल्याचे म्हटले जात आहे.
व्हिडीओमधील हा अपघात नौदलाच्या प्रात्यक्षिक सरावादरम्यान घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नौदलाचा प्रात्यक्षिक कार्यक्रम उद्या म्हणजेच ४ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी नौदलाचे जवान तयारी करत आहेत. सराव सुरु असताना हा पॅराशूटचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
हवेत पॅराशूट उघडल्यानंतर दोन्ही जवानांचे पॅराशूट जवळ आले. पुढे त्यांच्या दोऱ्या एकमेकांमध्ये गुंतल्या. दोऱ्या गुंतल्याने ते हवेतच गोल-गोल गटांगळ्या खाऊ लागले. त्यातील एका जवानाच्या पॅराशूटला तिरंगा जोडलेला होता. हवेतून गटांगळ्या खाऊन नौदलाचे दोन्ही जवान समुद्राच्या पाण्यात पडले. सुदैवाने नौदलाची एक बोट तेथे जवळच होती. त्यानंतर बोटीमधील अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही जवानांना पाण्यातून बाहेर काढले.
नौदलाच्या खास प्रात्यक्षिकासाठी विशाखापट्टणम खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ईस्टर्न कमांडचे फ्लॅद ऑफिरस कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर हे करणार आहेत. या प्रात्यक्षिक कार्याक्रमामध्ये नौदलाच्या अत्याधुनिक क्षमतांचे प्रदर्शन केले जाणार आहे. युद्धनौका, पाणबुडी, नौदलातील विमाने यांचा समावेश प्रात्यक्षिक कार्यक्रमात असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.