UP Crime : माथेफिरू बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य; भर रस्त्यात गर्लफ्रेंडचा हत्येचा प्रयत्न, VIDEO

Crime In Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांना तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलिसांनी फरार तरुणाचा शोध घेत आहेत.
UP Boyfriend tried to kill girlfriend
UP Boyfriend tried to kill girlfriendSaam Tv
Published On

UP Crime: उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावामध्ये एका माथेफिरु बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरुन जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या तरुणीचा जीव वाचवला. हल्ला झाल्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी माथेफिरु तरुणाविरोधात गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेशुद्ध पडलेली तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड मागील चार वर्षांपासून एकत्र आहेत. दुसऱ्या मुलांशी मैत्री केल्याने बॉयफ्रेंडने हा जीवघेणा हल्ला केला असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलीस माथेफिरु बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत.

UP Boyfriend tried to kill girlfriend
Surat News : ऑन ड्युटी CISF जवान किसनसिंग बाथरुममध्ये गेला अन्..., पुढे जे घडलं ते पाहून विमानतळावरील सगळेच हादरले!

उत्तर प्रदेशमधील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून माथेफिरु तरुण रस्त्यावर तरुणीचा ओढणीने गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते. आसपासचे लोक त्या तरुणीला सोडवून तरुणाला मारहाण करत आहेत. व्हिडीओच्या शेवटी तरुणी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडल्याचेही दिसते.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून माथेफिरु तरुण रस्त्यावर तरुणीचा ओढणीने गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते. आसपासचे लोक त्या तरुणीला सोडवून तरुणाला मारहाण करत आहेत. व्हिडीओच्या शेवटी तरुणी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडल्याचेही दिसते.

UP Boyfriend tried to kill girlfriend
Beed : बीड पुन्हा हादरलं, अपहरणाचा बनाव अन् पंकजा मुंडेंचं नाव, गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com