Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: रस्त्यावर बसची दहशत! वाऱ्याच्या वेगात आली अन् वाहनाचा झाला चुराडा; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत नेमके काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Shocking Cctv Video: सोशल मीडियावर आपल्याला काय अनेक अपघातांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी रेल्वे अपघात तर कधी रस्ते अपघात, अशा अनेक धक्कादायक अपघातांच्या घटना रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद होत असतात. त्यातच सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशाच एका अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. ज्यात भरधाव वेगात आलेली बस रस्त्यावरील दुचाकीना खेळण्यासारखी चुरडते. नक्की अपघात कसा घडला ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक रस्ता दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर एक व्यक्ती चालताना दिसत आहे. तर फुटपाथच्या बाजूला अनेक वाहने पार्क केलेली आहेत, अशातच जो व्यक्ती फुटपाथवर आहे जो अचानक फुटपाथवरुन घाबरुन पळताना दिसून येत आहे. मात्र पुढे पाहिले तर एक भरधाव वेगात बस येते आणि पार्क केलेल्या वाहनांना उडवते. सर्व घटना रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@crane.rasool'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''वेगाच्या चाकाखाली अनेक मोटारसायकली चिरडल्या!'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ २४ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला असून आतापर्यंत लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बहुधा ते धूम्रपान करत आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' बापरे खुप खतरनाक होत'' अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT