Viral video nine people riding one motorcycle SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral bike video: एक, दोन नाही तर बाईकवर बसले तब्बल ९ जणं; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Viral video nine people riding one motorcycle: सोशल मीडियावर एका मोटरसायकलवर तब्बल नऊ जण बसून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा धोकादायक प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून युजर्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सामान्यतः बाईकवर चालकासह दोन किंवा जास्तीत जास्त तीन जण प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल. नियमानुसार, एका दुचाकीवर केवळ दोन जणं प्रवास करू शकतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने अनेकांना आश्चर्यचकित केलंय. या व्हिडिओमध्ये एकाच मोटरसायकलवर तब्बल नऊ जण बसून रस्त्यावर प्रवास करताना दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक साधी बाईक आहे. त्यावर नऊ जण बसलेले दिसतात. साधारणपणे अशा प्रकारच्या बाईकवर चालकासह दोन जण बसण्याची जागा असते. मात्र या व्हिडिओमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसते. इतकी लोकं बसूनही ही मोटरसायकल रस्त्यावर सहजपणे चालताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करतायत.

यावेळी तीन जण मोटरसायकलच्या टाकीवर बसलेले आहेत. साधारणतः टाकीवर एक जण बसणंही धोकादायक मानलं जातं. मात्र या बाईकवर तीन जण फक्त बाईकच्या टाकीवर बसलेले आहेत. तर उरलेले सहा जण सीटवर कसेबसे बसलेले असून ते एकमेकांच्या आधाराने बॅलन्स ठेवताना दिसतात.

या संपूर्ण व्हिडीओमध्ये तुम्हाला आश्चर्यचकित करणारी अजून एक गोष्ट म्हणजे आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे बाईक चालवणारा अत्यंत चालवताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही गडबड किंवा भीती दिसत नाही. मोटरसायकलवर बसलेले इतर प्रवासी देखील अगदी निवांतपणे प्रवासाचा आनंद घेताना दिसतात.

युजर्सकडून विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येताना दिसतायत. काही युजर्सनी हा प्रकार पाहून विनोदी कमेंट्स केल्यात. तर अनेकांनी याला अत्यंत धोकादायक कृत्य म्हटलंय. एका युजरने लिहिलंय की, 'हे पाहून हसू येत असलं तरी हा प्रकार खूप धोकादायक आहे.' तर दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, 'असा निष्काळजीपणा कधीही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT