Viral Video: ९ महिन्यांपासून अडकलेली जीप बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट जुगाड; लोखंडी पाइपांचा पूल केला अन्.., पाहा व्हायरल व्हिडिओ

Villagers build pipe bridge to rescue vehicle: हिमाचल प्रदेशात पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने एका व्यक्तीची पिकअप गाडी तब्बल नऊ महिने अडकून पडली होती. अखेर ग्रामस्थांनी लोखंडी पाइपांचा तात्पुरता पूल तयार करून गाडी सुरक्षित बाहेर काढली.
Villagers build pipe bridge to rescue vehicle
Villagers build pipe bridge to rescue vehicleSAAM TV
Published On

मुसळधार पावसामुळे अनेकदा खराब झालेले रस्ते तुम्ही पाहिले असतील. या रस्त्यांची दुरुस्ती वेळेत न झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना किती मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर याचंच उदाहरण दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. २०२५ च्या पावसाळ्यात रस्ता वाहून गेल्यामुळे एका व्यक्तीची पिकअप गाडी तब्बल नऊ महिने अडकून पडली होती.

अखेर ग्रामस्थांच्या मदतीने लोखंडी पाइपांचा वापर करून तात्पुरता पूल तयार करण्यात आला आणि त्या मार्गावरून गाडी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

Villagers build pipe bridge to rescue vehicle
Viral Video: आकाशात ३ हजार फुटावर घडली दुर्घटना, 2 पॅराग्लायडर एकमेकांवर आदळले; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा, VIDEO

कुठे घडली ही घटना?

ही घटना हिमाचल प्रदेशातील पंडोह परिसरातील छपराहन पंचायतमधील कूट गावात घडलीये. याठिकाणी राहणारे तरुण ठाकूर यांची गाडी २०२५ च्या पावसाळ्यात रस्ता कोसळल्यामुळे अडकून पडली होती. मुसळधार पावसामुळे रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला होता, त्यामुळे वाहन पुढे किंवा मागे नेणं शक्य नव्हतं. पावसाळा संपल्यानंतर हिवाळाही संपला, तरीही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही.

तरुण ठाकूर यांनी सांगितलं की, गाडी अडकून असतानाही त्यांना दर महिन्याला तिच्या कर्जाच्या हप्त्या भरावा लागत होता. बराच काळ वाहन एकाच ठिकाणी उभं राहिल्यामुळे ते खराब होण्याचीही भीती होती. त्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

Villagers build pipe bridge to rescue vehicle
Viral Video: अगं बाई बस खाली...! बुमराहच्या गोलंदाजीवर साक्षीचं रिएक्शन व्हायरल, धोनीलाही हसू आवरेना

शेवटी तरुण ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्वतःच उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोखंडी पाइपांचा वापर करून तुटलेल्या रस्त्याच्या भागावर तात्पुरता पूल तयार केला. गेल्या गुरुवारी हा मार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर योग्य पद्धतीने गाडी त्या पाइपांवरून हळूहळू पुढे नेण्यात आली आणि अखेर ती सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला पोहोचली.

Villagers build pipe bridge to rescue vehicle
Viral Video: धावत्या ट्रेनमधून तरुण पडला, दारावर उभं राहून स्टंट करताना भयंकर घडलं; काळजाचा ठोका चुकवणा VIDEO

या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचं आणि जिद्दीचं कौतुक केलंय. तर काहींनी प्रशासनाच्या विलंबित कामकाजावर प्रश्न उपस्थित केलंय. 'गावकऱ्यांनी मिळून अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलंय,' अशी प्रतिक्रिया काही युजर्सने दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com