Saam Tv
व्हायरल न्यूज

बसचा ब्रेक फेल झाला, ड्रायव्हर नुसता ओरडत सुटला; पुण्यातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PMT Bus Brake Failure: पुण्यात भर गर्दीच्या रस्त्यावर PMT बसचे अचानक ब्रेक फेल झाले. या प्रसंगी ड्रायव्हर आणि कंडक्टरने प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Pune Viral Video: पुणे शहरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब असते, अशाच परिस्थितीत एखादी मोठी दुर्घटना होणे टळल्याची घटना समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ बसचे भर रस्त्यात अचानक ब्रेक फेल झाले आणि काही क्षणातच संपूर्ण रस्त्यावरील परिस्थिती चिघळू शकली असती. मात्र, या संकटकाळात बसचा चालक आणि वाहक यांनी जे प्रसंगावधान दाखवले, त्याचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

घटनेचा थरारक क्षण

ही घटना नेमकी पुणे शहरातील नेमकी कुठल्या परिसरातील आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा प्रसंग सकाळी घडल्याने सर्व परिसर गजबजलेला होता. या गर्दीतूनच एक बस (Bus) जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला. बस पुढे जात राहिली आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न बस चालकाने आणि कंटक्टरने केला.

बसमध्ये अनेक प्रवासी असल्याने क्षणभर सगळ्यांची धडधड वाढली होती. काही जणांनी तर घाबरून बसमध्येच किंचाळायला सुरुवात केली. पण अशा तणावपूर्ण क्षणी बसचालकाने आपले भान न गमावता बसला एका बाजूला वळवून थांबवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कंडक्टरही प्रवाशांना धीर देत दरवाजाकडे जाऊ नका, खाली उतरू नका असं सांगत होता.

ड्रायव्हरने दाखवली चपळाई

ड्रायव्हरने(Driver) ज्या प्रकारे प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोकळ्या भागाकडे बस वळवली, त्याने मोठी दुर्घटना टळली. समोरून येणारी वाहने, बाजूने चालणारे पादचारी, दुचाकीस्वार यांना कोणतीही इजा न होता, बस त्या मोकळ्या जागेत थांबवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT