Tanvi Pol
घाटात चालवताना नेहमी कमी गिअरमध्ये वाहन चालवा.
वळणांवर हॉर्न वाजवणे अत्यंत आवश्यक आहे.
ब्रेक्स आणि टायर्सची स्थिती पूर्वीच तपासा.
उतारावर हार्ड ब्रेकिंग टाळा, इंजिन ब्रेकचा वापर करा.
विशेष म्हणजे पावसाळ्यात आणि धुक्यात हेडलाईट्स सुरू ठेवा.
घाटात ओव्हरटेकिंग शक्यतो टाळा.
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा, उतावळेपणा करू नका.
घाटात गाडी बंद पडल्यास साइडला सुरक्षितपणे उभी करा.