Disgusting state of the women's compartment in Mumbai's CSMT-Goregaon local after feces was smeared by an unknown person viral video shows shocking visuals. Saam Tv
व्हायरल न्यूज

मुंबई लोकलमध्ये घाणेरडं कृत्य, महिला डब्यात विष्ठा फासली; प्रवाशांचा संताप

Mumbai Local Train Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एक मुंबईल लोकलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो महिलांनी व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तुम्हीही एकदा पाहा नेमके घडले काय?

Tanvi Pol

Women Coach Video: मुंबईची लोकल ट्रेन ही फक्त एक वाहतुकीचं साधन नसून ती लाखो मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या ट्रेनशिवाय मुंबईकरांचा दिवस सुरूही होत नाही आणि संपतही नाही. यासर्व गोष्टींमुळे मुंबई लोकलला मुंबई शहराचं काळीज असं म्हणणं अगदी योग्य आहे. मात्र, अलीकडेच या लोकल ट्रेनमधून एक अत्यंत संतापजनक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे, ज्यामुळेच सर्वसामान्य प्रवासी विशेषत म्हणजे महिला प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.

व्हायरल होत असलेली घटना घडली आहे सीएसएमटी-गोरेगाव लोकल ट्रेनच्या(Local Train) महिला डब्यात. सकाळी कॉटन ग्रीन स्थानकाहून निघालेल्या या लोकलच्या महिला डब्यात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने संपूर्ण डब्यामध्ये विष्ठा लावली होती. या घटनेमुळे डब्यामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली होती. सीटवर, खांबावर आणि डब्याच्या भिंतींवरदेखील विष्ठा लावलेली होती. हा प्रकार इतका भयानक होता की काही प्रवाशींना डब्यात बसणं तर सोडाच, उभं राहणंही कठीण झालं होतं, असे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

ही घटना उघडकीस आणणारी एक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानेव्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, महिलांनी घाण टाळण्यासाठी ठराविक कोपऱ्यात उभं राहण्याचा प्रयत्न केला आहे, तर काही महिला चक्क पुढच्या स्टेशनवर उतरून दुसऱ्या डब्यात जाण्याचा निर्णय घेताना दिसतात. व्हिडीओमध्ये दिसतं की महिलांचा संताप शिगेला पोहोचला आहे. सर्वजण हा प्रकार नेमका कुणी आणि का केला, याविषयी प्रश्न विचारत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवरील mazhituzhimumbai या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून त्यानंतर अनेक प्रवाशांनी नेटकरी वर्गातून यावर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''जर महिला डब्यातही आता सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण नसेल, तर महिलांनी प्रवास तरी करायचा कसा?" तर काही यूजर्संनी म्हटलं,"रेल्वे प्रशासनाने फक्त तिकीट वाढवणं आणि दंड लावणं हाच उद्देश ठेवू नये, तर अशा असभ्य प्रकारांवर देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.''

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

SCROLL FOR NEXT