Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चिमुकला सोसायटीत खेळत होता,कारने चिरडलं; महिला कार चालकाने जे केलं ते पाहून होईल संताप

Uttar Pradesh Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यात नक्की काय घडले ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहावा लागेल.

Tanvi Pol

Shocking Cctv Video: गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांसोबत अनेक धक्कादायक घटना घडत आहेत, ज्यांचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.त्यात पुन्हा एकदा एका चिमुकल्यासोबत भयंकर घटना घडली आहे,ज्यात सोसायटीमध्ये खेळत असताना एका महिला चालकाने चिमुकल्याला चिरडलं,धक्कादायर म्हणजे तेथून महिलेने पळायनही गेले आहे.संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तुम्हाला सोसायटीमध्ये खेळत असलेली अनेक लहान मुलं दिसत आहे.सर्व मुलं त्यांच्या नादात खेळण्यात मग्न असतात,मात्र त्याच वेळी सोसायटीमधून एक महिला कारमधून जात असते आणि जात असताना तिने तिथे खेळत असलेल्या एका चिमुकल्याच्या अंगावरुन कार नेते,मात्र इतर चिमुकल्यांनी तिला सांगून कार थांबवली जाते.सर्व घटनेत चिमुकल्याला बाहेर काढण्यात येते.धक्कादायक म्हणजे महिला कार मधून उतरुन संपूर्ण प्रकार पाहते आणि परत कारमध्ये बसून निघून जाते.

संपूर्ण घटना गाझियाबादमधील असल्याचे समजत असून व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे,मात्र तो एक्सच्या @rupeshjverma या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया केलेल्या असून व्हिडिओला मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

घटना (incident)पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली आहे,''निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा हा प्रकार दिसतोय'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कडक कारवाई झाली पाहिजे'' तिसऱ्या यूजरने लिहिले,''नशीब मुलगा बचावला''तर अनेकांनी कारवाई कराच अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT