Viral Video: बापरे...लोकलच्या दारात उभं राहून तरुणीचा जीवघेणा प्रवास; मनाला चटका लावणारा VIDEO पाहाच

Mumbai Local Train Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे.नेमके असं काही घडतं ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.
Mumbai Local Train Video
Viral VideoSaam Tv
Published On

Risky Traveling Video: मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.मुंबई लोकल ट्रेनमधील असणारी अफाच गर्दी जगभरात चर्चेचा विशष असते.असा स्थितीत काही प्रवासी लोकल ट्रेनमधून आपल्या जीवाची जराही पर्वा न करता धोकादायक प्रवास करतात.त्याच सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यामध्ये एक तरुणी अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसतेय.

व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकल ट्रेन दिसत आहे.लोकल (Local)ट्रेन एका स्टेशनवरुन जात असताना दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करताना दिसत आहे,मात्र अशात सर्वांचे लक्ष जाते ते म्हणजे अत्यंत धोकादायकरित्या दरवाजाला लटकून एक तरुणी प्रवास करत असते.अक्षरक्षा:तरुणीचे पायही अर्धे दरवाजाच्या बाहेर आहेत.जोरात धक्का लागल्यावरही तरुणी बाहेर पडण्याची शक्यता असते.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

धोकादायक प्रवास करतानाच हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील @mumbaimatterz या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ कधीचा आहे आणि नेमका कुठल्या स्टेशनवरील आहे हे समजले नाही,मात्र व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले असून नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली,''तुमचे काम किंवा ती तातडीची बैठक कितीही महत्त्वाची असली तरी, ती तुमच्या आयुष्यापेक्षा कधीही महत्त्वाची नसते'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''प्रत्येक जीव मौल्यवान आहे आणि आपल्या कुटुंबांना मुंबई लोकलमध्ये सुरक्षित प्रवास करावा लागतो. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची वेळ आली आहे''अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mumbai Local Train Video
Mumbai Local Train Viral Video: हे फक्त मुंबई लोकलमध्येच घडू शकतं; जिवावर उदार होऊन ऑफिसला जाणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com