Shocking Viral Video : सार्वजनिक ठिकाणी तरुणाचा थरारक अदांज; केल असे काही कृत्य की लोक घाबरून पळू लागले; पाहा VIDEO
सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे सर्वात सोपे आणि जलद मार्ग आहे. आपल्याला अनेक व्यक्तीच्या अनेक कला या माध्यमातून पाहायल मिळतात. शिवाय या व्हायरल व्हिडिओला पाहून अनेकजण तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात आणि फेमस होतात.त्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्यात एका तरुणाच्या शरीराची लवचिकता आपल्याला पाहायल मिळते मात्र सध्या या व्हायरल व्हिडिओला भूताच अॅंगल देऊन व्हायरल केला जात आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये कधी डान्सचे व्हिडिओ पाहिले असतील त्या व्हिडिओ भितीदायक गाण्यावर केलेले डान्स असतील किंवा मेकअपचे व्हिडिओ असतात त्यामध्येही अनेकदा कोणता अभिनय करायचा असल्यास भितीदायक मेकअप करावा लागतो.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणाने त्याच्या शरीराच्या लवचिकतेचा फायदा घेत अनेकांना गंमत म्हणून घाबरवले आहे. हा व्हिडिओ(Video) प्रचंड चर्चेत आला आहे.
वाचा तर व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीस एक तरुण मॉलच्या एस्केलेटवरुन खाली येत आहे मात्र तुम्ही त्याच्याकडे नीट पाहिले तर त्याची मान व्यवस्थित आहे मात्र लवचिकतेमुळे त्याचे पाय वाकडे त्याने केलेले आहे. तेथून तो खाली येत असतो तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि तेही थोडेसे घाबरतात. असाच हा तरुण विविध ठिकाणी जातो आणि लोकांना आश्चर्यचिकत(Shocking) करतो.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''एक्सवरील @ArvindKumar32G'' या अकाउटवर शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओला ''जीता जागता भूत, भाई तू रात में मत निकलना, नहीं तो पापा की परियां ऊपर पहुंच जाएंगे'' असे कॅप्शन देण्यात आले आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले असून लाखोंच्याच घरात व्ह्यूज(Views) मिळत आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.