Bharat Jadhav
दोन दिवसापूर्वी अनंत अंबानीच्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला. शाही लग्न सोहळा पाहून अनेकजण आश्चर्यचिकत झालेत. अशाच शाही थाटात लग्न करण्याचा विचार आपण करत असतो. पण त्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो.
मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर लग्नाच्या खर्चामुळे अनेक अडचणी येत असतात. अनेक पालक मुलांची लग्नं धूमधडाक्यात करण्याचा विचारात असतात. परंतु त्यांच्या डोक्यात बजेटचाही विचार असतो.
आपलं लग्नशाही पद्धतीने पार पडावं, असं अनेकांना वाटत असतं. पण पैसा नसल्याने त्यांचं शाही थाटात लग्न करण्याचं स्वप्न हे पूर्ण होत नाही. पण कमी पैशातही चांगलं लग्न सोहळा करता येते ते पाहूया.
लग्नाच्या बाबतीत थोडी हुशारी आणि दूरदृष्टी वापरली तर मर्यादित खर्चातही एक चांगला विवाह सोहळा पार पडत असतो.
जर तुम्ही नवीन मॅरेज गार्डन, फार्म हाऊस किंवा शहराबाहेर एखादे ठिकाण निवडले तर तुम्ही पैशांची बचत करू शकता.
लग्नपत्रिकेवर हजारो रूपये खर्च करू नका. प्रत्येकाला डिजिटल कार्ड पाठवा.
लोकांना फक्त मर्यादित पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे अन्नपदार्थ मर्यादित ठेवा.
लग्नात जास्त वऱ्हाडी नका बोलवू. अगदी जवळचे नातेवाईक, मित्र, त्याच विभागातील सहकाऱ्यांना कार्यक्रमासाठी बोलवा.
लग्न समारंभात सजावटीत खऱ्या फुलांचा वापर कमीत कमी करा. त्याऐवजी कृत्रिम फुले, रंगीबेरंगी कपडे इत्यादी वापर करा.
लग्नाचा दिवस नेहमी स्मरणात ठेवण्यासाठी आपण फोटो काढत असतो. त्यावरही खर्च होत असतो. त्यामुळे फोटोग्राफर लावत असताना तो कमी प्ररिचीत असेल असा निवडा. त्याची फी देखील कमी असेल.
गावात लग्नघरी बस्ता करण्याची प्रथा असते. त्यात कपड्यावर मोठा खर्च केला जातो. यावर कात्री लावा. कमी किमतीची कपडे घ्या.
अनेकवेळा वरपक्षातील मंडळाची अनेक वेगवेगळ्या मागण्या असतात. त्या करू नका.
येथे क्लिक करा