ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा असतात ज्याचे पालन करणे आवश्यक असते. तुमच्या आयुष्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे कार्य मानले जाते.
परंतु, हिंदू धर्मामध्ये लग्नाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे.
हिंदू धर्मात विवाह कार्यात अनेक पद्धती-रीती असतात त्यामधील एक म्हणजे सारख्या गोत्रांच्या स्त्री-पुरुषामध्ये विवाह टाळणे. मात्र यामागे शास्त्रीय कारण काय जाणून घेऊया.
हिंदू शास्त्रानुसार, गोत्र म्हणजे सप्तऋषींचे वंशज असतात अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात अंगिरस, अत्रि, गौतम, कश्यप, भृगु, वशिष्ठ आणि भारद्वाज असे सात गोत्र असतात.
सारखा गोत्र असलेले मुलगा आणि मुलगी नात्याने एकमेकांचे भाऊ-बहीण असतात त्यामुळे एकाच गोत्रात लग्न करू नका असे सांगीतले जाते.
तसेच वैज्ञानानुसार, एकाच गोत्रात लग्न केल्यामुळे डीएनए मधील संबंधामुळे पुढे संतान प्राप्तीत बाधा येऊ शकते.
त्यामुळे लग्न करण्यापूर्वी तुमची पत्रिका, गोत्र तपासून पुढील गोष्टी केल्या पाहिजेल यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य सुखकर होते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही