Shocking Video: एकीकडे सर्वांसाठी शिक्षण हे सरकारचे ब्रीदवाक्य ऐकवले जात असताना, दुसरीकडे तर देशाच्या काही भागांमध्ये आजही विद्यार्थी शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही हेलावून जाईल आणि एकच प्रश्न उरतो ७५ वर्षांहून अधिक काळ लोकशाहीची वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात अजूनही मुलांना शिक्षणासाठी जीवाशी खेळावं लागतं का?
हा धक्कादायक(Shocking) प्रकार झारखंडमधील असल्याचे समजत आहे. मात्र याची खात्री होऊ शकली नाही. येथे एक जुना पूल कोसळलेल्या अवस्थेत असूनही, तोच पुल विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मार्गात एकमेव दुवा आहे. त्यामुळे दररोज सकाळी शाळेत जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना विद्यार्थी या धोकादायक पुलावरून जाण्याचा धाडसी निर्णय घेतात.
पुलाची अवस्था इतकी भयावह आहे की,लोखंडी अँगल्स सैल झाले आहेत. जरा चुकीचं पाऊल पडलं तर थेट नदीत कोसळण्याचा धोका आहे, अशा स्थितीत हे लहानग्यांचे पाय चालत असताना भय वाटते. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता असूनही परिस्थितीवश विद्यार्थ्यांना हा जीवघेणा मार्ग स्वीकारावा लागतो.
पुलाची अवस्था इतकी भयावह आहे की,लोखंडी अँगल्स सैल झाले आहेत. जरा चुकीचं पाऊल पडलं तर थेट नदीत कोसळण्याचा धोका आहे, अशा स्थितीत हे लहानग्यांचे पाय चालत असताना भय वाटते. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता असूनही परिस्थितीवश विद्यार्थ्यांना(Student) हा जीवघेणा मार्ग स्वीकारावा लागतो.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.