घराबाहेर खेळताना चिमुकलीला ऑटोने उडवले, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Heartbreaking Incident Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. या घटना पाहिल्यानंतर प्रत्येक पालक आपल्या लहान मुलांची अधिक काळजी घेईल. नक्की काय घडले व्हिडिओत पाहा.
Heartbreaking Incident Video
CCTV फुटेजमध्ये दिसलेला भीषण क्षण, जिथे चिमुकली ऑटोखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झालाSaamTv
Published On

Tamilnadu Shocking Video: तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फक्त तीन वर्षांची एका चिमुकलीने रस्त्यावर खेळत असताना आपला जीव गमावला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.

घटनेचे संपूर्ण वर्णन

ही दुर्दैवी घटना(Shocking incident) रामनाथपुरम शहरात घडली. एक तीन वर्षांची चिमुकली घरासमोर रस्त्याच्या कडेला खेळत होती. दरम्यान त्याचवेळी एक वेगाने येणारा ऑटोरिक्षा अचानक तिला धडक देतो आणि काही क्षणातच तिच्यावरून चाक जातात. या धडकेनंतर ती जागीच कोसळते आणि तिचा जागीच मृत्यू होतो.

खेलते-खेलते सड़क पर ऑटो के सामने आ गई बच्ची, कुचलने से हुई दर्दनाक मौत- VIDEO https://www.aajtak.in/india/news/story/tragic-accident-toddler-playing-outside-home-runs-before-autorickshaw-died-chennai-news-cctv-lcly-rptc-2280821-2025-07-06

घटना सीसीटीव्हीत कैद

व्हायरल(Viral) होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एक चिमकुली अचानक घरातून खेळता खेळता रस्त्यावर येते. त्याचवेळी एक रिक्षा चालकही येतो आणि रिक्षाचालकाला काही समजताच चिमुकली अचानक आल्याने रिक्षाच्या खाली चिरडली जाते. परिसरात असलेल्या नागरिकांमुळे सर्व प्रसंग रिक्षा चालकास समजतो तो रिक्षा थांबवतो. सर्वत्र गर्दी जमते. चिमकुलीची आई रडत रडत त्याच रिक्षात बसत तिला जवळील दवाखान्यात घेऊन जाते.

सीसीटीव्हीमधील दृश्ये अंगावर शहारा आणणारी

या दुर्घटनेची सीसीटीव्ही क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओने नेटिझन्सना सुन्न केलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी पालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Heartbreaking Incident Video
क्षणात सगळं संपलं! घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकल्याला ऑटोने चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com